मृत शेतकर्याच्या मुलास धनादेश
By Admin | Updated: May 27, 2014 07:14 IST2014-05-27T07:14:03+5:302014-05-27T07:14:03+5:30
वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या वरवे खुर्द येथील बबन नामदेव भोरडे या शेतकर्यांंच्या वारसाला वनविभागाच्या वतीने पाच लाखांचा धनादेश देण्यात आला

मृत शेतकर्याच्या मुलास धनादेश
नसरापूर : वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या वरवे खुर्द येथील बबन नामदेव भोरडे या शेतकर्यांंच्या वारसाला वनविभागाच्या वतीने पाच लाखांचा धनादेश देण्यात आला. उपविभागीय वनअधिकारी, भोरचे आर. ए. सातेलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नसरापूर वनक्षेत्रपाल जे. एम. पिसाळ यांच्या माध्यमातून बबन नामदेव भोरडे यांचा वारस मुलगा बाबुराव बबन भोरडे यास पाच लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी वनपाल ए. आर. लांडगे, लक्ष्मणराव शिंदे , लक्ष्मण पवार आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या वर्षी ६ आॅगस्ट रोजी बबन नामदेव भोरडे हे नेहमीप्रमाणे गुरे चारण्याकरिता रानात गेले असताना तरसाने हल्ला केला होता. त्यात बबन भोरडे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान जखमी बबन भोरडे यांचे ७ सप्टेंबर रोजी निधन झाले. शासन निर्णयाच्या अनुषंगाने वनविभागाच्या वतीने वन्य प्राण्यांच्या हल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला नुकसान भरपाई दिली जाते. या आधारे वनविभामार्फत हालचाल करून बबन भोरडे यांच्या वारसाला आधार मिळाला. भोर तालुक्यात वनविभामार्फत प्रथमच अशा प्रकारची नुकसान भरपाई देण्यात आली. (वार्ताहर)