खोटे नाव सांगून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:09 IST2020-12-07T04:09:22+5:302020-12-07T04:09:22+5:30

पुणे : खोटे नाव सांगून लग्नाचे आमिष दाखवून ६ लाख रुपये हात उसने घेऊन एकाने तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार ...

Cheating on a young woman by showing her the lure of marriage under a false name | खोटे नाव सांगून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक

खोटे नाव सांगून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक

पुणे : खोटे नाव सांगून लग्नाचे आमिष दाखवून ६ लाख रुपये हात उसने घेऊन एकाने तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी रिहान शेख ऊर्फ अमर दिनेश सिंह (वय २४, रा. उंड्री) याला अटक केली आहे. याप्रकरणी एका ३२ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०१९ पासून सुरु होता. आरोपीने फिर्यादी यांना आपले नाव रिहान शेख असल्याचे सांगितले. त्याना लग्नाचे आश्वासन दिले. वेगवेगळी कारणे सांगून व्याजासह पैसे परत करण्याच्या बोलीवर त्यांच्याकडून ६ लाख रुपये घेतले. त्यांनी पैसे परत मागितल्यावरही ते परत न करता घरात शिरुन त्यांना जवळ ओढळून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

Web Title: Cheating on a young woman by showing her the lure of marriage under a false name