नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
By Admin | Updated: November 15, 2016 03:53 IST2016-11-15T03:53:33+5:302016-11-15T03:53:33+5:30
मोबाईलवर संपर्क साधून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या महिलेविरुद्ध लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
पुणे : मोबाईलवर संपर्क साधून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या महिलेविरुद्ध लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
याप्रकरणी अभिजित नागवडे यांनी फिर्याद दिली आहे़ ही घटना मार्चमध्ये घडली असून, एका महिलेने नागवडे यांच्या पत्नीशी मोबाईलवर संपर्क साधला़ त्यांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आॅनलाईन बँकेमार्फत खात्यात ४९ हजार ६०० रुपये भरण्यास सांगितले़ त्यानंतरही नोकरी न लावता फसवणूक केली़ (प्रतिनिधी)