पिंपरी : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून दोन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महेश निंबाळकर (वय ३४, रा. गणेशनगर, नवी सांगवी, पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,निंबाळकर यांना ३१ जानेवारी २०१६ ला अज्ञात व्यक्तीचा फोन आला. फोनवरील व्यक्तीने 'कमुडिटी शेअर मार्केट' मध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. तसेच या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवले. निंबाळकर यांचा विश्वास संपादन करून फोनवरील व्यक्तीने ३१ नोव्हेंबर २०१६ पर्यंत दोन लाख रुपये आपल्या बँक खात्यावर भरण्यास सांगितले. काही दिवसानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नसल्याचे तसेच आपली फसवणूक होत असल्याचे निंबाळकर यांच्या लक्षात आले. यावरून निंबाळकर यांनी पोलिसात धाव घेतली.
शेअरमार्केटमधून चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 20:41 IST
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून दोन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शेअरमार्केटमधून चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक
ठळक मुद्दे'कमुडिटी शेअर मार्केट' मध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला