कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक - सावंत
By Admin | Updated: July 2, 2017 03:58 IST2017-07-02T03:58:03+5:302017-07-02T03:58:03+5:30
राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केली, मात्र त्यात फक्त हवेचे बुडबुडे आहेत. जाहीर केल्यापेक्षा अत्यंत कमी शेतकऱ्यांना

कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक - सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केली, मात्र त्यात फक्त हवेचे बुडबुडे आहेत. जाहीर केल्यापेक्षा अत्यंत कमी शेतकऱ्यांना जुजबी कर्जमाफी केली जात आहे, असा आरोप काँग्रेसचे राज्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
जीएसटी या नव्या करप्रणालीची खरी जनक काँग्रेसच असल्याचा दावा करून सावंत यांनी केंद्र सरकारने प्रशासनाची तयारी नसताना ही करप्रणाली सुरू केल्याची टीका केली.
सरकारच्या सांगण्यानुसार ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे, प्रत्यक्षात मात्र त्यांनी कर्जमाफीसाठी लागू केलेल्या निकषांनुसार फक्त १५ लाख किंवा त्यापेक्षा कमीच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. ४० लाख नाही तर साडेचार लाख शेतकऱ्यांचाच सातबारा कोरा होणार आहे. ३४ हजार कोटी रूपयांची नाही तर फक्त ५ हजार कोटी रूपयांचीच कर्जमाफी मिळणार आहे, असे ते म्हणाले.