फसवणूक करणारा दुसरा आरोपीही ताब्यात
By Admin | Updated: May 12, 2017 05:26 IST2017-05-12T05:26:57+5:302017-05-12T05:26:57+5:30
फोन कॉल्स आणि सीसीटीव्ही फुटेजद्वारे शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये ग्राहकाची फसवणूक

फसवणूक करणारा दुसरा आरोपीही ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : फोन कॉल्स आणि सीसीटीव्ही फुटेजद्वारे शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या परप्रांतीय युवकाचा साथीदारही पोलिसांच्या जाळ्यात अडकला. सायबर क्राईम सेलच्या पथकाने थेरगाव येथून गुन्हेगाराला ताब्यात घेतले.
महंमद नावेद महंमद खुर्शिद अन्सारी (वय २०) असे अटक केलेल्या साथीदाराचे नाव आहे. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या कॅनरा बँकेमध्ये ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी बुधवारी महंमद अन्सार महंमद अक्रम अन्सारी याला अटक करण्यात आली होती. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याच्याबरोबर एक व्यक्तीही असल्याचे आढळले होते.
टॉवर लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या आरोपीला थेरगाव येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती सायबर सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके यांनी दिली.