चातुर्मासानिमित्त साधू- संतांचे शहरात आगमन
By Admin | Updated: June 30, 2017 03:58 IST2017-06-30T03:58:22+5:302017-06-30T03:58:22+5:30
या वर्षी पुणे शहारात सुमारे १३ हून अधिक जैन स्थानकांत चातुर्मास होणार आहेत. महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी म.सा. यांचादेखील चातुर्मास पुण्यातील औंध श्रावक संघात होईल.

चातुर्मासानिमित्त साधू- संतांचे शहरात आगमन
लोकमत न्यूज नेटवर्क
बिबवेवाडी : या वर्षी पुणे शहारात सुमारे १३ हून अधिक जैन स्थानकांत चातुर्मास होणार आहेत. महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी म.सा. यांचादेखील चातुर्मास पुण्यातील औंध श्रावक संघात होईल.
५ जुलै रोजी औंध श्रावक संघात चातुर्मास प्रवेश कार्यक्रम महाराष्ट्र प्रवर्तक प. पू. कुंदनऋषीजी म. सा, जिनशासक प्रभावक प.पू. प्रशांतऋषीजी म.सा., प.पू. डॉ. अलोकऋषीजी म.सा., प.पू. विनीतदर्शनाजी म.सा., प.पू. तिलकदर्शनाजी म.सा. आदिठाणा यांचा चातुर्मास औध भागातील नागरस रोड मेडीपॉर्इंट हॉस्पिटलच्या जवळ होणार आहे. चातुर्मास प्रवेश ५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता भव्य जुलूस काढून होईल. या चातुर्मासाच्या यशस्वितेसाठी रमणलाल लुंकड, शिरीष चोपडा, धरमचंद फुलफगर, सुनील नहार, रवींद्र बलाई, नितीन बांठिया, सचिन नहार, सुरेश राठोड, दीपक बांठिया, पारस कटारिया, रवींद्र लुंकड, राजेंद्र लुंकड यांच्यासह संघाचे सर्व पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.