शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चासकमान धरण ९२ टक्के भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 17:26 IST

काठालगतच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन चासकमान प्रकल्प प्रशासनाने केले आहे....

राजगुरुनगर (पुणे) : खेड आणि शिरूर तालुक्याला वरदान ठरलेले चासकमान धरण शुक्रवारी (दि. २८) दुपारी ४ वाजता ९२ टक्के भरल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. चासकमान धरण जलाशयाची पाणी पातळी ६४८.६४ मी आणि साठा  (१९८.७०५ दलघमी ९२.६४%) झाला असून चासकमान प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण आणि पाणी साठ्यात होणारी निरंतर वाढ लक्षात घेता काही तासात धरणाचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या आठवड्यात धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. त्यात देखील गेल्या दोन तीन दिवसांत पाऊस वाढला आहे. यामुळे दिवसाला साधारणपणे ७ ते ८ टक्के पाणीसाठा होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवार दि २५ रोजी सकाळी ९ वाजता धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे ४०० क्युसेक वेगाने विसर्ग सोडण्यात आला आहे. याद्वारे येथील वीज केंद्र कार्यान्वित झाले आहे. कालव्यात पाणी सोडल्याने खेड, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी या पाण्याचे स्वागत करीत समाधान व्यक्त केले आहे.

सध्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा सुरु आहे. पुढील काही तासात धरणातील पाणीसाठा ९३ टक्के पाणी होऊ शकतो. त्यानंतर पाणी वाढल्यास सांडव्यावरून भीमा नदीत विसर्ग सोडण्यात येणार असल्याचे धरण प्रशासनाकडू सांगण्यात आले. धरणाचे दरवाजे उघडले तर भीमा नदीला पूर येणार आहे. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावी. काठालगतच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन चासकमान प्रकल्प प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :DamधरणPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड