शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

धर्मादाय आयुक्तालय लावणार गरिबा घरचे लग्न, शिवकुमार डिगे यांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 03:40 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील आणि गरिबांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी धर्मादाय निधीतून केली जाणार आहे. धर्मादाय आयुक्तालयाने याबाबत पुढाकार घेतला असून, त्यासाठी खास जिल्हानिहाय समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक धर्मादाय संस्थेला या समितीला निधी द्यावा लागेल असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे - शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील आणि गरिबांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी धर्मादाय निधीतून केली जाणार आहे. धर्मादाय आयुक्तालयाने याबाबत पुढाकार घेतला असून, त्यासाठी खास जिल्हानिहाय समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक धर्मादाय संस्थेला या समितीला निधी द्यावा लागेल असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी तसे परिपत्रक काढले आहे. राज्यातील विविध धर्मादाय संस्थांकडे काही लाखांपासून ते कोटी रुपयांपर्यंत निधी शिल्लक आहे. विविध धर्मादाय संस्थांचा निधी हा समाजोपयोगी कामासाठी खर्च झाला पाहिजे. अनेक संस्था शिक्षण आणि वैद्यकीय कारणासाठी हा निधी खर्च देखील करतात. मराठवाडा आणि विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यात मुलीच्या लग्नाची चिंता हेदेखील एक कारण आहे. धर्मादाय निधीचा उपयोग जर गरीब शेतकºयांच्या मुलींच्या लग्नासाठी झाल्यास त्याचा समाजाला चांगला उपयोग होईल. शेतकी आत्महत्येच्या घटनांतही त्यामुळे घट होईल. तसेच गरिबांमध्ये आपलादेखील कोणी विचार करणारा घटक समाजामध्ये आहे, असा संदेश त्यामुळे जाईल. गरिबांचे सामुदायिक विवाह मुख्य उद्देशमहाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५०नुसार सार्वजनिक हितासाठी निधीचा वापर करता येऊ शकतो. गरिबांचे सामुदायिक विवाह हा देखील धर्मादायचा उद्देश आहे. त्यासाठी जिल्हानिहाय समिती स्थापन करण्यात यावी. त्यात प्रत्येक धार्मिकस्थळांचे एक विश्वस्थ, शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांतील विश्वस्तांचा समावेश करता येईल.सदस्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार संबंधित जिल्ह्यातील धर्मादाय उप आयुक्त अथवा सहायक धर्मादाय आयुक्तांना राहील. या समितीची नोंदणी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमांतर्गत करावी. त्याचे खाते बँकेत उघडावे.धर्मादाय संस्थांमध्ये जमा झालेल्या निधीपैकी काही सामुदायिक विवाहासाठी घ्यावा. त्यानंतर गरीब घटकांना मुलींच्या विवाहासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करावे. त्यानुसार सामुदायिक विवाह करावा, असे परिपत्रक डिगे यांनी काढले आहे.

टॅग्स :Puneपुणे