सार्वजनिक ठिकाणी दहशत माजविणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:11 IST2021-04-05T04:11:13+5:302021-04-05T04:11:13+5:30

पुणे : आपापसांत भांडणे करून विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर तसेच भारतनगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या व बिअरच्या बाटल्या फोडून ...

Charges filed against eight people for terrorizing public places | सार्वजनिक ठिकाणी दहशत माजविणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी दहशत माजविणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : आपापसांत भांडणे करून विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर तसेच भारतनगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या व बिअरच्या बाटल्या फोडून गंभीर जखमी करणाऱ्र्या तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सोनु सुनील छजलानी, सौरभ प्रवीण अस्पत आणि राहुल सुनील छजलानी (तिघेही रा. भारतनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणात उत्तम जाधव, प्रणाली अभिजित जाधव, ऋषी जाधव, पूजा सोनू आणि सागर शिरवाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस शिपाई अरूण बन्सी चव्हाण (वय ४८) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणात गंभीर जखमी करणे, दहशत माजविणे, साथरोग कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Charges filed against eight people for terrorizing public places