आरोप- प्रत्यारोपांच्या फैरींनी वातावरण तप्त
By Admin | Updated: February 17, 2017 05:05 IST2017-02-17T05:05:12+5:302017-02-17T05:05:12+5:30
पुणे महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून आरोप- प्रत्यारोपाच्या फैरींनी वातावरण तप्त झाले आहे. सभा, मेळावे

आरोप- प्रत्यारोपांच्या फैरींनी वातावरण तप्त
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून आरोप- प्रत्यारोपाच्या फैरींनी वातावरण तप्त झाले आहे. सभा, मेळावे सुरू झाले आहेत. पुण्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबरच पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट, शिक्षण मंत्री विनोद तावडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुण्यात अनेक ठिकाणी रोड शो आणि सभा घेतल्या. या वेळी बोलताना ते म्हणाले, ‘‘मागील अडीच वर्षात भाजप सरकार ने पुण्यासाठी काय केले हे मुख्यमंत्र्यांनी पुण्यात येऊन सांगावे.
राजकीय नेत्यांसोबत आता फिल्मी तारेही प्रचारात येऊ लागले आहेत. कॉँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी पुण्यात विविध ठिकाणी सभा घेतल्या. ‘‘या देशातील मुस्लिमांना भारत सोडून जाण्याची भाषा केली जाते़ परंतु, असे सांगणाऱ्यांना मला सांगायचे आहे, की हा देश आमचाही आहे़ या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लिम समाजाचे मोठे योगदान आहे, हे विसरु नका़ आमच्या प्रामाणिकपणावर शंका घेऊ नका, अशा शब्दांत त्यांनी भाजपचे नाव न घेता टीका केली.
शिवसेनेतर्फे आमदार निलम गोऱ्हे, शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी प्रचाराची आघाडी सांभाळली आहे.
(प्रतिनिधी)