सोनसाखळी चोरट्यास पाठलाग करून पकडले

By Admin | Updated: June 13, 2014 05:04 IST2014-06-13T05:04:48+5:302014-06-13T05:04:48+5:30

सोनसाखळी चोरून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या वचन लक्ष्मण गोसावी (वय ३०, रा. लोहकरे चाळ, बोपखेल) या चोरट्याला नागरिक व पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

Chanussakhali was caught following thieves | सोनसाखळी चोरट्यास पाठलाग करून पकडले

सोनसाखळी चोरट्यास पाठलाग करून पकडले

पिंपरी : सोनसाखळी चोरून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या वचन लक्ष्मण गोसावी (वय ३०, रा. लोहकरे चाळ, बोपखेल) या चोरट्याला नागरिक व पोलिसांनी पाठलाग करून पकडले. ही घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास जुनी सांगवीतील गजाननमहाराज मठासमोरील महापालिका शाळेजवळील रस्त्यावर घडली.
याप्रकरणी संगीता कोंडिबा चोरघे (वय ४०, नवनाथ अपार्टमेंट, जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरघे रस्त्याने पायी जात होत्या. दरम्यान, समोरून वचन त्यांच्या जवळ आला आणि त्यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीच्या दोन सोनसाखळ्या हिसकाविल्या. त्यानंतर सरकारी दवाखान्याच्या दिशेने आरोपी पळून जात असतानाच चोरघे यांनी आरडा-ओरडा केला. चोरीचा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आरोपीचा पाठलाग सुरू केला.
दरम्यान, आरोपी वचन याने नागरिकांच्या दिशेने दगड फेकून मारला. हा प्रकार सुरू असतानाच एका नागरिकाने पोलिसांना कळविले. काही वेळातच त्या ठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनी जिगर पाटील व निखिल अशोक गाडुते या नागरिकांच्या मदतीने आरोपीचा पाठलाग केला. अखेर आरोपीला जुनी सांगवीतील बीएसएनएल कार्यालयाजवळ पकडून चोरलेला ऐवज हस्तगत केला. आरोपीला अटक केली असून, याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रकचालकास लुटले; एकाला अटक
पिंपरी : रस्त्यात ट्रक अडवून रहमतुल्ला अकबरसाहब अली (वय ३०, रा. धरमगट्टा, भद्रवती जि. सिमोगा, कर्नाटक) या चालकाकडील ऐवज चोरट्यांनी लुटला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, एकजण फरार आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास चिंचवडगावातील अहिंसा चौकात घडली. सागर अंकुश कानडी (वय २४, रा. संतोषनगर, चिंचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Chanussakhali was caught following thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.