शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बदलती जीवनशैली तरुणांमधील ह्रद्यविकाराचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 20:29 IST

तरुणांमध्ये वाढत्या हृद्यविकाराला, तरुणांची बदललेली जीवनशैली तसेच कामाचा ताण अामंत्रण देत असल्याचे समाेर अाले अाहे.

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये तरुणांना हृद्यविकाराचा झटका अाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समाेर अाल्या अाहेत. माजी केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रेय यांच्या 21 वर्षीय मुलाचेही ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने, तरुणांमध्ये वाढत चाललेल्या हृद्यविकाराबाबत चिंता व्यक्त करण्यात येत अाहे. जंकफूड, पुरेशी झाेप न घेणे, सततचा ताण, माेबाईलचा अतिवापर, व्यायामाचा अभाव ही तरुणांची बदलती जीवनशैली हृद्यविकारांना अामंत्रण देत असल्याचे समाेर अाले अाहे.     तरुणांमध्ये हृद्यविकाराचा धाेका दिवसेंदिवस वाढत अाहे. मागील काही काळात तरुणांचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणे समाेर अाली हाेती. काही दिवसांपूर्वीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू हृद्यविकाराच्या झटक्याने झाला हाेता. तरुणांमध्ये या वाढत्या अाजाराविषयी लाेकमतने ससूनचे हृद्यविकारतज्ञ डाॅ. हेमंत काेकणे यांच्याशी संवाद साधला. जंकफूड, माेबाईलचा अतिवापर, व्यायामाचा अभाव अाणि बदललेली जीवनशैली ही अाजच्या तरुणाईतील हृद्यविकाराची कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.     डाॅ. काेकणे म्हणाले, तरुणांना येणारा हृद्यविकाराचा झटका अाणि त्यात त्यांचा हाेणारा मृत्यू ही अाज तरुणांमधील माेठी समस्या अाहे. तरुणांमध्ये हृद्यविकाराच्या समस्या वाढत चालल्या अाहेत.याला अनेक कारणे अाहेत,  त्यात काही टाळण्यासारखी अाहेत तर काही टाळता येऊ न शकणारी. न टाळता येऊ शकणाऱ्या कारणांमध्ये अनुवंशीकता, उच्च रक्तदाब, डायबेटिस ही कारणे अाहेत. राेजचा कामाचा ताण, कामातील स्पर्धा, कमी झाेप घेणे त्याचबराेबर माेबाईल व साेशल मिडीयाचा अतिवापर ही सध्या तरुणांमध्ये हृद्यराेगाला अामंत्रण देणारी कारणे अाहेत. सध्या तरुणाई जंकफूडचे अतिसेवन करताना अाढळते . तसेच व्यायामही केला जात नाही. या जाेडीलाच धूम्रपान यांसारख्या गाेष्टींमुळेही तरुणांमध्ये हृद्यराेग बळवताना दिसत अाहे. अाधी वयाच्या 55 व्या वर्षाच्या पुढे हृद्यविकाराच त्रास हाेत हाेता, अाता हे वय 25 वर येऊन ठेपले अाहे. हि स्थिती नक्कीच काळजी करण्यासारखी अाहे. राेज अामच्याकडील हृद्यविकाराच्या रुग्णांमध्ये जवळजवळ 40 टक्के रुग्ण हे तरुण अाहेत.     तरुणांनी अापल्याला हृद्यविकारचा त्रास हाेऊ नये यासाठी काळजी घेणे अावश्यक अाहे. जी टाळता येण्यासारखी कारणे अाहेत ती टाळायला हवीत. तरुणांनी जास्त ताण घेऊ नये. अाठवड्यातून किमान 5 दिवस राेज 30 मिनिटे व्यायाम करायला हवा. कमीत कमी बैठी कामं करावीत. शक्यताे जंकफूड खाणे टाळायला हवे. त्याचबराेबर हृद्यविकाराचा झटका येऊन गेलेल्या रुग्णाची याेग्य काळजी घेणे अावश्यक अाहे. तरुणांनी अापली जीवनशैली बदलली तर या हृद्यविकाराच्या समस्येपासून सुटका करुन घेता येईल.

टॅग्स :PuneपुणेHeart Attackहृदयविकाराचा झटकाHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स