पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल
By Admin | Updated: January 14, 2015 03:14 IST2015-01-14T03:14:17+5:302015-01-14T03:14:17+5:30
बिजलीनगर परिसरातील पाण्याच्या टाक्यांची देखभाल-दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे या टाक्यांमधून होणाऱ्या पाणीपुरवठा वेळापत्रकात १५ जानेवारीपासून बदल होणार आहे.

पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल
पिंपरी : बिजलीनगर परिसरातील पाण्याच्या टाक्यांची देखभाल-दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे या टाक्यांमधून होणाऱ्या पाणीपुरवठा वेळापत्रकात १५ जानेवारीपासून बदल होणार आहे.
बिजलीनगर, रस्टन कॉलनी, पवनानगर, चापेकर चौक, चिंचवडेनगर, स्पाईन रस्ता, वाल्हेकरवाडी आदी भागातील वेळापत्रक बदलेले. बिजलीनगर, पवनानगर, चापेकर चौक या भागात सकाळी ४.३० ते ७.३०, शिवनगरी, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडीत सायंकाळी ४.३० ते ७.३० या वेळेत पाणीपुरवठा होईल. (प्रतिनिधी)