विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त वाहतूक मार्गात बदल
By Admin | Updated: December 31, 2014 23:23 IST2014-12-31T23:23:20+5:302014-12-31T23:23:20+5:30
पुणे ग्रामीण जिल्ह्यात पुणे-अहमदनगर रोडवरील कोरेगाव भिमा जवळील पेरणे फाटा, ता.हवेली येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून दलित बांधव वाहनासह येत असतात.

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त वाहतूक मार्गात बदल
पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात पुणे-अहमदनगर रोडवरील कोरेगाव भिमा जवळील पेरणे फाटा, ता.हवेली येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून दलित बांधव वाहनासह येत असतात. या मार्गावरील वाहतुकीची वारंवार कोंडी होते यासाठी मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ नुसार दि.१ जानेवारी २०१५ रोजी सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत पुणे राज्य मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
पर्यायी मार्ग-अहमदनगर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी अवजड वाहने शिक्रापूर-चाकण मार्गाने पुणे व मुंबईकडे वळवावी. तसेच पुण्याहून शिरुर-नगरकडे जाणारी वाहतूक सोलापूर रोडने चौफुला मार्ग, न्हावरा फाटा-शिरुर-नगरकडे वळवावी.