शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

‘बकरी ईद’निमित्त वाहतुकीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 19:51 IST

बकरी ईदनिमित्त बुधवारी ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठाण होणार आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव एकत्र येणार आहेत.

ठळक मुद्देबुधवारी गोळीबार चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग नमाज पठणाच्यावेळी बंद

पुणे : बकरी ईदनिमित्त विविध मार्गांवरून गोळीबार मैदान चौकाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. यादिवशी बुधवारी (दि. २२) मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक ते ढोले पाटील चौकादरम्यानची वाहतूक सकाळी ६.३० पासून नमाज पठण पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. बकरी ईदनिमित्त बुधवारी ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठाण होणार आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव एकत्र येणार आहेत. यापार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी गोळीबार चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग नमाज पठणाच्यावेळी बंद राहील. तसेच सीडीओ चौक ते गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक सकाळी ७ ते १० यावेळीत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ढोले पाटील चौकाकडून गोळीबार मैदानाकडे तर सोलापुर रस्त्याने मम्मादेवी चौकात येणाऱ्या वाहनांना गोळीबार मैदानाकडे जाणारा मार्ग बंद असेल. भैरोबानाला ते गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येते बंद करून एम्प्रेस गार्डन व लुल्लानगरकडे वळविण्यात येईल. कोंढवा परिसरातून गोळीबार मैदानाकडे येणारी सर्व जड माल वाहतूक वाहने, प्रवासी वाहतूक करणारी जड वाहने, एसटी व पीएमपी बसेसला मनाई करण्यात आली आहे. या वाहनांना लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौकातून इच्छित ठिकाणी जाता येईल, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिले. 

टॅग्स :PuneपुणेBakri Eidबकरी ईदTravelप्रवास