शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे गुन्हे शाखेत फेरबदल ; काही पथके बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 14:44 IST

आठवड्यापूर्वी पोलीस आयुक्तालयात अधिका-यांच्या झालेल्या बैठकीमध्ये आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव मांडला होता.

ठळक मुद्देगुन्हे शाखेत महत्वाचे फेरबदल करण्याच्या हालचाली काही दिवसांपासून केल्या होत्या सुरु अमली पदार्थ विरोधी पथक, सामाजिक सुरक्षा पथक पोलीस आयुक्त कार्यालयातच राहणार गुन्ह्यांची उकल लवकरात लवकर व्हावी या साठी आयुक्तांनी गुन्हे शाखेत महत्वाचे फेरबदल

पुणे : पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. तर शाखेची काही पथके देखील बंद करण्यात आली असून तेथील अधिकारी कर्मचा-याची इतरत्र बदली झाली आहे. गुन्हे शाखेमध्ये युनिट १, युनिट २, युनिट ३, युनिट ४, युनिट ५ तसेच दरोडा प्रतिबंधक पथक, खंडणी विरोधी पथक, होमिसाईड पथक, प्रॉपर्टी सेल, सामाजिक सुरक्षा विभाग, संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाची दोन पथके (गुंडा स्क्वाड), वाहन चोरी विरोधी पथक अशी तेरा पथके होती. गुन्ह्यांची उकल लवकरात लवकर व्हावी या साठी आयुक्तांनी गुन्हे शाखेत महत्वाचे फेरबदल करण्याच्या हालचाली काही दिवसांपासून सुरु केल्या होत्या. आठवड्यापूर्वी पोलीस आयुक्तालयात अधिका-यांच्या झालेल्या बैठकीमध्ये आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार हा फेरबदल करण्यात आला आहे.     बरखास्त करण्यात आलेल्या पथकातील पोलिसांना सध्या अस्तिवात असलेल्या युनिट १, युनिट २, युनिट ३, युनिट ४, युनिट ५,  खंडणी विरोधी पथक, भरोसा सेल या मध्ये सामावून घेतले आहे. बदली करण्यात आलेल्या अधिका-यांची नावे पुढीलप्रमाणे (कंसात जुने ठिकाण) : राजेंद्र कदम (दरोडा विरोधी पथक) युनिट १, गजानन पवार (युनिट २) युनिट २, दिपक निकम (प्रॉपर्टी सेल) युनिट ३, अंजुम बागवान (एओसीसी उत्तर) युनिट ४, दत्तात्रय चव्हाण (युनिट ५) युनिट ५, रघुनाथ जाधव (खंडणी विरोधी पथक) खंडणी विरोधी पथक, विजया कारंडे (महिला सहाय्य कक्ष) भरोसा सेल, स्वाती सुधीर थोरात (अमली पदार्थ विरोधी पथक) ज्येष्ठ नागरिक कक्ष, दीपक लगड (वाहनविरोधी पथक) प्रिव्हेन्टिव्ह बँच, गिता दोरगे (एमओबी) एम ओ बी, क्रांती पवार (प्रशासन, गुन्हे शाखा) प्रशासन, गुन्हे शाखा), वियज टिकोळे (युनिट २) तांत्रिक विश्लेषण, सुनिल दोरगे (अमली पदार्थ विरोधी पथक) अमली पदार्थ विरोधी पथक), मनिषा झेंडे (सामाजिक सुरक्षा) सामाजिक सुरक्षा....................कार्यक्षेत्रातच युनिटची कार्यालये : युनिट १ चे कार्यालय पोलीस आयुक्तालयाच्या आवारात असून युनिट २ चे कार्यालय सोमवार पेठ पोलीस वसाहत, युनिट ३ चे कार्यालय पौड रोडवरील अंटी गुंडा स्कॉडच्या कार्यालयात, युनिट ४ चे कार्यालय खडकीतील रेंजहिल येथे, युनिट ५ चे कार्यालया मेगा सेंटरशेजारी असणार आहे. अमली पदार्थ विरोधी पथक, सामाजिक सुरक्षा पथक पोलीस आयुक्त कार्यालयातच राहणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस