पिंपरी : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनच्या लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेता म्हाळुंगे गाव, बालेवाडी येथील वाहतुकीत शनिवारी (दि. २२) दुपारी बारा ते रात्री आठपर्यंत बदल करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बालेवाडी येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. या कार्यक्रमात २० लाख लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र, तसेच दहा लाख लाभार्थ्यांना या योजनेचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे.