सैनिकांबाबतची मानसिकता बदला
By Admin | Updated: February 21, 2017 03:15 IST2017-02-21T03:15:32+5:302017-02-21T03:15:32+5:30
‘सैनिक अतिशय खडतर आणि धोक्याच्या पद्धतीने जगतात व आपल्या देशाचे, देशवासियांचे रक्षण करतात. पाकिस्तानसह इतर शेजारी

सैनिकांबाबतची मानसिकता बदला
पुणे : ‘सैनिक अतिशय खडतर आणि धोक्याच्या पद्धतीने जगतात व आपल्या देशाचे, देशवासियांचे रक्षण करतात. पाकिस्तानसह इतर शेजारी देशांकडून होणाऱ्या विश्वासघातकी कारवाया उधळून लावतात. त्यांच्यामुळेच भारतीय नकाशाचे स्थान टिकून आहे. मात्र, समाजाची त्यांच्याप्रती मानसिकता अतिशय संकुचित असून, ती बदलण्याची गरज आहे’, असे मत लक्ष्य फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी केले.
लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल रिजन-१ च्या वतीने आयोजित ‘शौर्य... गाथा अभिमानाची’ या कार्यक्रमात प्रभुदेसाई बोलत होत्या. लायन्स क्लबचे जिल्हा प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, रेखा शेट्टी, रिजन चेअरपर्सन सुनील पंडित, माधुरी पंडित, उपप्रांतपाल गिरीश मालपाणी, रमेश शहा, समन्वयक आनंद आंबेकर, विभागीय अध्यक्ष बलविंदर राणा, राजगोपाल कट्टी व विलास मुळे आदी उपस्थित होते.
सुनील पंडित यांनी उपक्रमांची माहिती दिली. आनंद आंबेकर यांनी स्वागत केले. सतीश धोका, प्रदीप बर्गे आणि विनीता खोसे यांनी सूत्रसंचालन केले. विलास मुळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
१ ‘सैनिकांच्याप्रती आदराची भावना ठेवली पाहिजे. वारंवार सैनिकही समाजाचे चित्र बदलावे, अशी आशा व्यक्त करतात. भारतीय सैनिक स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी सीमेवर उभे आहेत. प्राणांचे बलिदान देत आहेत.
२ आपण त्यांच्या जीवावर सुखी जीवन जगत असूनही, त्यांच्याप्रती संतापजनक वक्तव्य करतो, ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. भारतीय सैनिकांप्रती आदर, विश्वास आणि अभिमान ठेवला, तर त्यांचे मनोधैर्य वाढेल आणि सीमाभागात येणाऱ्या सर्व संकटांचा ते सामना करू शकतील. तेव्हा सैनिकांप्रती समाजाची भावना बदलण्यासाठी लायन्स क्लब्जसारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे त्या म्हणाल्या.
३ चंद्रहास शेट्टी म्हणाले, ‘समाजाची सेवा करण्याचे भाग्य लायन्स क्लबला लाभले आहे. शंभर वर्षांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी लायन्स आगामी काळातही कटिबद्ध आहे.’