शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

शहर राष्ट्रवादीचे नेतृत्व बदला

By admin | Updated: August 12, 2014 03:53 IST

भोसरी विधानसभेचे आमदार विलास लांडे यांच्या समर्थकांची गुप्त बैठक सोमवारी कासारवाडीतील एका हॉटेलात झाली.

पिंपरी : भोसरी विधानसभेचे आमदार विलास लांडे यांच्या समर्थकांची गुप्त बैठक सोमवारी कासारवाडीतील एका हॉटेलात झाली. विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्याबरोबर लांडे यांचे समर्थक असलेल्या नगरसेवकांनी शहर राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वबदलाची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली, तर पक्षातील काही असंतुष्ट पदाधिकारी, नगरसेवक यांच्याकडून अडचणी निर्माण होऊ शकतील. ही शक्यता लक्षात घेऊन शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करावेत, अशी आग्रही भूमिका लांडे समर्थकांनी घेतली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील विरोधात असलेल्या मोजक्या नगरसेवकांना वगळून लांडे यांनी अन्य नगरसेवकांना गुप्त बैठकीस बोलावले होते. भोसरीतील काही नगरसेवक, तसेच पक्षाच्या शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी विरोधात असल्याने त्यांच्याकडून निवडणुकीत दगाफटका होऊ शकतो, याची विशेष खबरदारी म्हणून शहर कार्यकारिणीचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, त्यात बदल करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. हे बदल घडून आले, तरच पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढणे सोईस्कर होणार आहे अन्यथा अपक्ष लढणेच फायद्याचे ठरेल, अशी चर्चा बैठकीत झाली. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे २१ नगरसेवक उपस्थित होते.लांडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीची चर्चा शहरभर होती. लांडे समर्थकांची गुप्त बैठक शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्व बदलास कारणीभूत ठरते की काय, याबद्दलची उत्सुकता वाढविण्यास ही बैठक कारणीभूत ठरली आहे. (प्रतिनिधी)