शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

Chandrayaan 2 : तोरा मिरवणाऱ्या NASA चे पुणेकराने टोचले कान, पुढे काय झालं ते वाचून वाटेल अभिमान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 19:03 IST

नासानेही पुणेकर युवकाची दखल घेत अभिनंदन ट्विटचा खुलासा केला आहे. 

अंतराळ विज्ञान आणि संशोधनात चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सोमवार 22 मे रोजी दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावलेल्या जीएसएलव्ही एमके-3 एम-1 या प्रक्षेपकाने यशस्वीरीत्या उड्डाण करून चांद्रयान-2 ला यशस्वीरीत्या पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवले आहे. त्यानंतर इस्रोने चांद्रयान-2 चे उड्डाण यशस्वी झाले असून, हे यान पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचल्याची घोषणा केली आहे. इस्रोच्या या कामगिरीचे जगप्रख्यात अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासानेही अभिनंदन केले. मात्र, नासाने आपल्या ट्विटरमध्येही स्वत:चीच पाठ थोपविण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने भारतीय अंतराळ संस्था इस्रोचे अभिनंदन केले. मात्र, नासाने या ट्विटमध्येही स्वत:चेच गोडवे गायल्याचं दिसून आलं. त्यानंतर, भारतीय ट्विटर युजर्संने नासाला चांगलेच सुनावले. त्यापैकी, एका पुणेकर ट्विटरच्या ट्विटला नासाने उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे हे ट्विटर अकाऊंट खरे आहे, की नाही हेही अद्याप माहित नाही. पण, नासानेही पुणेकर युवकाची दखल घेत अभिनंदन ट्विटचा खुलासा केला आहे. 

चंद्रयान 2 च्या यशस्वी उड्डाणासाठी इस्रोचे अभिनंदन. आमच्या डीप स्पेस नेटवर्कच्या सहाय्याने या मोहिमेतील कम्युनिकेशनसाठी मदत दिल्याचा आम्हाला गर्व आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरुन आपणास मिळणाऱ्या माहिताची आम्हालाही आशा आणि उत्सुकता आहे. विशेष म्हणजे पुढील काही वर्षात अर्टेमिस मिशनद्वारे आम्हीही तेथे आमचा अंतराळवीर पोहोचेल. 

नासाच्या या गर्विष्ट आणि स्वताचाच उदोउदो करणाऱ्या ट्विटबद्दल भारतीय ट्विटर्संनी नासाला चांगलेच फैलावर घेतले. त्यापैकी, पुणेकर असलेल्या केतन रामटेक यांनी नासाला रिप्लाय देताना, आपण आमचा कमीपणा दाखवता की अभिनंदन करता असे ट्विट केले होते. विशेष म्हणजे पुणेकराच्या या ट्विटला नासाने उत्तर दिले असून त्यामध्ये इस्रोलाही मेंशन केले आहे. भारतीयांना नासाचे कान टोचल्यानं नासाने पुन्हा रिप्लाय दिला आहे. नासाने 3 तासानंतर दुसरे ट्विट करुन पुन्हा एकदा भारताचे अभिनंदन केले. 

आम्ही नेहमीच अंतराळातील संसोधन मोहिमेला सहकार्य केले आहे. तसेच, या मोहिमेतून मिळालेल्या अनुभवाबद्दल अभिमानही व्यक्त केला आहे. वैश्विक सहकार्य हे आमच्या मार्गदर्शक सिद्धांतांपैकी एक आहे. ब्रम्हांडातील न उलगणाऱ्या प्रश्नांचे उत्तर शोधून मानवाच्या संशोधकीय विस्तारासाठी हे सहकार्य गरजेचं असल्याचं नासाने म्हटलं आहे. नासाच्या मिळालेल्या रिप्लायनंतर पुणेकर ट्विटर युजर केतन रामटेक यांनी आनंद व्यक्त केला आहे. नासाने माझ्या ट्विटरला उत्तर दिले, आज माझा दिवस बनला, असे रिट्विट केतन यांनी केले आहे.  

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रोNASAनासाPuneपुणे