शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

... म्हणून चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील गणपती मंडळाचे अध्यक्ष व्हावे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 20:34 IST

गणेशोत्सव जवळ आला की पुणे शहराकडे सगळ्यांचे डोळे लागून असतात.  पुण्यातील गणेशोत्सव, इथली आरास यांची सर्वत्र चर्चा असते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या धर्तीवर पुण्यातही डॉल्बीमुक्त गणेशोत्सव करण्याची इच्छा बोलून दाखवली आणि नवा वादाला तोंड फोडले.

पुणे : गणेशोत्सव जवळ आला की पुणे शहराकडे सगळ्यांचे डोळे लागून असतात.  पुण्यातील गणेशोत्सव, इथली आरास यांची सर्वत्र चर्चा असते. यंदा मात्र चर्चा आहे ती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची. पाटील यांनी कोल्हापूरच्या धर्तीवर पुण्यातही डॉल्बीमुक्त गणेशोत्सव करण्याची इच्छा बोलून दाखवली आणि नवा वादाला तोंड फोडले. त्यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव समजून घेण्यासाठी थेट पाटील यांनीच मंडळाचे अध्यक्ष व्हावे असे आव्हान दिले आहे. आता त्यावर पाटील काय पवित्रा घेतात हेच बघणे  औत्सुक्याचे ठरणार आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात काही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उत्सवात डॉल्बी लावू नका, मर्यादित पथके लावा, नाहीतर गणेश मंडळांवर खटले दाखल करणार असे सांगून उत्सवांवर बंदी घालू नका अशी मागणी केली. यावेळी माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील, रवींद्र माळवदकर, किशोर शिंदे, आशिष साबळे पाटील, अजय दराडे आदी उपस्थित होते.  

 पाटील म्हणाल्या की, 'पालकमंत्री पाटील हे कोल्हापूरचे आहेत. त्यांना  पुण्याची अजिबात माहिती नाही. त्यामुळे त्यांनी मंडळाचे अध्यक्ष होऊन बघावे. दरवर्षी नवा अधिकारी घरचा कायदा राबवतो.त्यामुळे कार्यकर्त्यांना नाहक मनस्ताप भोगावा लागतो. गुजरातमध्ये नवरात्रीसाठी पहाटे ४ पर्यंत परवानगी देतात, त्याप्रमाणे पुण्यातही उत्सवाच्या काळात रात्री १२ पर्यंत स्पीकर लावण्यास परवानगी द्यावी. 

माळवदकर म्हणाले, डॉल्बी डीजे म्हणजे काय, साऊंड सिस्टीम काय आहे हे प्रशासनाला कोर्टात सुद्धा सांगता आले नाही. कोर्टाने दिलेल्या आदेशांचे गणेश मंडळे पालन करीत आहेत. परंतु काही लोक स्वतःचे नियम लावून उत्सवात विघ्न आणत आहेत. पोलिसांना डेसीबल मोजण्याची मशीन देण्यात आली आहे. पण ते कशाप्रकारे मोजावे याबाबत कुठलेही प्रशिक्षण दिले नाही. त्यामुळे या डेसीबल मोजण्याच्या मशीनवर विश्वास ठेवायचा का नाही हा गंभीर प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा