शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील पुण्याचे नवे पालकमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 19:40 IST

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून बापट भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर मोठ्या मताधिक्क्याने लोकसभेवर निवडून गेले.

पुणे : पुण्यातून गिरीश बापट लोकसभेत गेल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याविषयी सर्वांचं उत्सुकता होती. त्यात राधाकृष्ण विखे पाटील, यांच्यासह अनेक नेत्यांची नावे चर्चेत आल्यानंतर उत्कंठा शिगेला पोहचली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे कृषी, फलोत्पादन आणि महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे.  २०१४ साली राज्यात भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी गिरीश बापट यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, पुण्याचे पालकमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट हे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पुण्यातून मोठ्या मताधिक्क्याने लोकसभेवर निवडून गेले. तेव्हापासूनच बापट यांच्यानंतर पुण्याचे पालकमंत्री कोण याविषयीच्या राजकीय चर्चांना उधाण आले होते.मात्र भाजपाकडून पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे देण्यात येणार याविषयी कमालीची गुप्तता राखण्यात आली होती. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्री पद सोपवत भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारीच दिल्याचे दिसत आहे.

 खासदार गिरीश बापट यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेले पुण्याचे पालकमंत्री पद महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा निर्णय घेतला. निवडणुकीच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात ते मोर्चेबांधणी करत असल्यामुळे पुण्यातील कार्यकर्त्यांबरोबर त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले पाटील कोल्हापूरचे असले तरी पुण्याशी त्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असल्यापासूनचा संपर्क आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदार संघात ते लोकसभा निवडणूक काळात ठाण मांडून बसले होते. पुण्यातील काही निवडक कार्यकर्ते त्यांनी मदतीला घेतले होते. त्यामुळेच त्यांचा त्यांच्याबरोबर चांगला संपर्क आहे. खुद्द बापट यांनीच पाटील यांच्याकडे ही जबाबदारी द्यावी असे सांगितले असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळेच त्यांची नियुक्ती झाल्याचे भाजपा कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. 

लोकसभा निवडणुकीत बारामती मतसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कांचन कुल यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी थेट बारामतीच्या बालेकिल्ल्यात शड्डू ठोकून शरद पवारांनाच आव्हान दिले होते.. काही काळ तर वारं बदलणार अशीच चर्चा रंगली होती.. त्यामुळे संपूर्ण राष्ट्रवादीच्या गोट्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.चंद्रकांत पाटलांनी लोकसभा निवडणुकीत बारामती मतसंघात कांचन कुल यांच्या प्रचारार्थ कंबर कसली होती...

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलgirish bapatगिरीष बापटDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा