आंबेडच्या सरपंचपदी चंद्रकांत जागडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:11 IST2021-02-13T04:11:55+5:302021-02-13T04:11:55+5:30
निवडणूक अधिकारी म्हणून डी. एस. साखरे यांनी काम पाहिले. ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय जागडे, सोनाली विकास ...

आंबेडच्या सरपंचपदी चंद्रकांत जागडे
निवडणूक अधिकारी म्हणून डी. एस. साखरे यांनी काम पाहिले. ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय जागडे, सोनाली विकास जागडे, नीलिमा पासलकर, सुनंदा जागडे, उपस्थित होते.
माजी सरपंच नामदेवराव जागडे, चेअरमन नितीन पासलकर, कृष्णा जागडे, जयवंत पासलकर, विष्णू जागडे, मुगुट निकम, सीताराम जागडे,नवनाथ जागडे , बिरा जागडे, धनंजय जागडे, सुधीर जागडे, उल्हास जागडे, आदी ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचाचे अभिनंदन केले. वेल्हे तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश जागडे म्हणाले, गावच्या विकासासाठी सर्व ग्रामस्थांनी एकजूट होऊन सरपंच व उपसरपंच निवडणूक बिनविरोध केली. गावच्या विकासासाठी आमदार निधी, जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या विविध योजनांतून भरीव विकासकामे राबविण्यात येणार आहेत. सर्व ग्रामस्थांचे आभार नितीन पासलकर यांनी केले .
--
फोटो क्रमांक : १२मार्गासनी आंबेड ग्रामपंचायत.
फोटोओळी : आंबेड (ता. वेल्हे) सरपंच चंद्रकांत जागडे गणेश जागडे व इतर.