चंदेरी तारकांची चांदीच चांदी..!
By Admin | Updated: September 30, 2014 02:04 IST2014-09-30T02:04:24+5:302014-09-30T02:04:24+5:30
निवडणुकीच्या प्रचारासाठी अधिक उमेदवार आणि कमीतकमी वेळ, यामुळे अधिकाधिक मतदारांर्पयत पोहोचण्यासाठी उमेदवारांना गर्दी खेचणा:या सिनेअभिनेत्रींना यंदा मोठी मागणी आह़े

चंदेरी तारकांची चांदीच चांदी..!
>निवडणुकीच्या प्रचारासाठी अधिक उमेदवार आणि कमीतकमी वेळ, यामुळे अधिकाधिक मतदारांर्पयत पोहोचण्यासाठी उमेदवारांना गर्दी खेचणा:या सिनेअभिनेत्रींना यंदा मोठी मागणी आह़े त्यामुळे त्यांच्या मानधनातही वाढ झाली आह़े प्रचाराच्या भाऊगर्दीत सिनेतारकांची चांदी होत असल्याचे चित्र आहे.
मराठी चित्रपट, मालिकांमधील तरुण अभिनेत्रींना सध्या चांगली मागणी असून, त्यांचे पुढील 12 ते 13 दिवस प्रचंड धावपळीत जाणार आह़े डेली एपिसोडचे दररोजचे शूटिंगचे शेडय़ूल आणि प्रचार याचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न सध्या या तारखा करीत आहेत़ त्यात मराठी तारका या ग्रुप याच दरम्यान अमेरिकेच्या दौ:यावर जात असल्याने अन्य तारकांना चांगलीच मागणी आली आह़े
निवडणुका मग त्या लोकसभेच्या असो नाही तर विधानसभेच्या, गर्दी जमविण्यासाठी आणि मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी काही दशकांपासून सिनेअभिनेत्यांना जाहीर सभा, रॅलींसाठी बोलविण्याची पद्धत रुजली आह़े मात्र, तेव्हा त्याला आतासारखे व्यावसायिक स्वरूप आले नव्हत़े ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार हे काँग्रेससाठी अनेक ठिकाणी सभा घेत असत़ त्यांचे भाषण ऐकण्यासाठी केवळ काँग्रेसच नाही तर सर्वपक्षीय कार्यकर्ते, मतदार जमा होत असत़ राजेश खन्ना हे सुरुवातीला उमेदवारांच्या रॅलीमध्ये सहभागी होत होत़े त्यानंतर त्यांनी रीतसर काँग्रेसमध्ये प्रवेश करून देशभरात अनेक उमेदवारांच्या प्रचारात सहभाग घेतला होता़ राज बब्बर हेही अशाच प्रकारे निवडणूक सभांच्या माध्यमातून राजकारणात आल़े या स्टार प्रचारकांना देशभरातून मागणी अस़े
प्रचारसभा आणि रॅलींना गर्दी कमी होऊ लागल्याने पक्षाशी काहीही संबंध नसतानाही केवळ चित्रपट, मालिकांमुळे घराघरांत पोहोचलेल्या तारक-तारकांना उमेदवार बोलावू लागल़े त्यातून मोठे मानधन मिळू शकते हे लक्षात आल्यावर त्याकडे इव्हेंट आयोजकांचे लक्ष गेले व या सिनेतारका कार्यक्रमांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली़ त्यामुळे त्याला संपूर्ण व्यावसायिक स्वरूप आले आह़े निवडणुका आणि नवरात्र एकत्र आल्याने अनेकांनी आपल्या अप्रत्यक्ष प्रचारासाठी नवरात्र उत्सवात देवीची आरती करण्यासाठी सिनेतारकांना बोलाविले आह़े तारका आल्यावर त्या भागातील महिला, तरुण यांची मोठी गर्दी होत़े नवरात्रीच्या आरतीला उपस्थित राहण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने या उमेदवारांचे आणखीच फावले आह़े याबाबत ‘मनोरंजन’चे मोहन कुलकर्णी म्हणाले, की गेल्या महिन्यापासूनच इच्छुक उमेदवारांकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी सिनेतारकांची मागणी होत होती़ केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागातून सध्या चांगली मागणी आह़े नवरात्र उत्सव मंडळाच्या आरतीसाठी सध्या असंख्य तारका बिझी आहेत़ त्यातून उमेदवाराचा अप्रत्यक्ष प्रचार केला जातो़ मालिकांमध्ये दररोज दिसणा:या नायिका घराघरांत पोहोचत असल्याने त्यांना सर्वाधिक मागणी आह़े
सुनील महाजन म्हणाले, की शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आपल्या मराठी कलावंतांच्या संघटना तयार केल्या आहेत़ या दोन्ही पक्षांशी अनेक नामवंत कलावंत सभासद झाले आहेत़ लोकसभा निवडणुकीपासून ते त्याच पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जात आहेत़ अन्य पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारास त्यांनी नकार दिला आह़े अपक्षाचा प्रचार करायचा असेल तर काहींनी तयारी दर्शविली आह़े
महेश टिळेकर म्हणाले, की गेल्या महिनाभरापासून ‘मराठी तारकां’ना अनेक पक्ष, उमेदवारांकडून मागणी आली होती़ सर्वप्रथम काँग्रेस नेत्यांनी संपर्क केला होता़ हा कार्यक्रम घेऊन आम्ही 12 तारकांसह 1 ते 14 ऑक्टोबर्पयत अमेरिकेच्या दौ:यावर आहोत़ हा दौरा खूप आधी ठरलेला असल्याने कोणाचेही निमंत्रण घ्यायचे नाही, असे आम्ही सर्वानी मिळून ठरविले होत़े
25 हजारांपासून 1 लाखांर्पयत
4नवरात्रीच्या देवीच्या आरतीला उपस्थित राहण्यापासून ते प्रचारफेरीत सहभागी होण्यासाठी मराठी तारक-तारका या प्रामुख्याने 25 हजार रुपयांपासून 1 लाख रुपयांर्पयत मानधन घेत आहेत़ त्यांना असलेली मागणी आणि उमेदवारांची अपेक्षा यानुसार ते कमी-जास्त होत असत़े
4याशिवाय येण्या-जाण्याचा खर्च, लांबचे ठिकाण असेल तर हॉटेलचा खर्च घेतला जातो़ प्रचारफेरीमध्ये जवळपास 2 ते 3 तास सहभागी होण्याच्या दृष्टीने नियोजन असत़े एक कलावंत साधारण एका दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या कार्यक्रमात सहभागी होत असतात़
सई ताम्हणकर, तेजश्री प्रधान, सोनाली कुलकर्णी, मधुरा वेलणकर, प्रिया बापट, प्राजक्ता माळी यांना सध्या मागणी आह़े अनेक उमेदवारांनी प्रामुख्याने रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रण दिले आह़े
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर या दोन दिवसांत त्यांच्या वेळा निश्चित होतील़ प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रामुख्याने सहभागी होण्याची उमेदवारांकडून निमंत्रणो मिळत आह़े
विवेक भुसे