शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुण्यावर विशेष प्रेम- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 13:04 IST

चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते...

पुणेपुणे हे बुद्धीवंतांचे शहर असल्याने तिथले निर्णय घेताना दमछाक होते. पुण्यात कोंडीमुळे दिवसा चांदणं दिसतं त्यामुळे याला चांदणी चौक नाव पडले, असा माझा समज होता. पण आज अजित दादांमुळे चांदणी चौकाच्या नावाचा इतिहास समजला. अशी मिश्किल टिपण्णी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केली. गडकरींच्या आशीर्वादाने चांदणी चौकातील काम पूर्ण झाले. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी शहरात डबल टेकर फ्लायओव्हर उभारण्यात येणार, असंही फडणवीस म्हणाले. ते चांदणी चौकातील पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. देशाचे वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे लोकार्पण झाले.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, पुणे विमानतळाचे लवकर जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याच्या विकासात वेगाने भर पडणार आहे. पुरंदरच्या विमानतळासाठी केंद्राच्या सर्व परवानग्या पूर्ण आहेत. त्यामुळे विमानतळाचे काम लवकर सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट हा एकमेव पर्याय आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुण्यावर विशेष प्रेम आहे.

हायड्रोजन भविष्य आहे-

यावेळी नितीन गडकरी म्हणाले, पुणे आता अधिक वाढवू नका. हे शहर आता प्रदूषित करु नका. मी लहान असताना माझ्या बहिणीकडे स्वारगेटला राहायला यायचो, तेव्हा पर्वतीवरुन गार हवा यायची. पण आता शहरातील प्रदुषणात वाढ झाली आहे.  मला भारतातून पेट्रोल आणि डिझेल हद्दपार करायचे आहे.  इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा. हायड्रोजन हे भविष्य आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करु नका तर कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा. तेच भविष्य आहे, असंही गडकरी म्हणाले. पुण्याला पेट्रोल- डिझेलपासून मुक्त केले तर चाळीस टक्के प्रदुषण कमी होईल. पुण्यातील कचऱ्याचा उपयोग रिंग रोड तयार करण्यासाठी वापरला तर पुण्यात कचरा उरणार नाही.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौकातील रस्त्याचे लोकार्पण पार पडले. आज पुण्यातील ८६५ कोटी रुपये किंमतीच्या एनडीए चौक (चांदणी चौक) प्रकल्प व रस्त्याच्या कामाचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ऑनलाइन उपस्थिती), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उपस्थित होते. यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPuneपुणेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस