मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
By Admin | Updated: March 16, 2015 04:29 IST2015-03-16T04:29:45+5:302015-03-16T04:29:45+5:30
गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या काही भागांत गारपिटीसह पाऊस होत असून, सोमवारी पुणे शहर व आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह काही

मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या काही भागांत गारपिटीसह पाऊस होत असून, सोमवारी पुणे शहर व आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे़
शहरात आता उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे़ शहरात आज काही काळ आकाश ढगाळ होते़ पाऊस येईल अशी शक्यता वाटत असतानाच जोरदार वाऱ्यांमुळे ढग पांगले़ उद्या आकाश अंशत: ढगाळ राहून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे़