चिंबळी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

By Admin | Updated: June 13, 2017 03:57 IST2017-06-13T03:57:47+5:302017-06-13T03:57:47+5:30

ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा कारभार नीट चालेना, ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थ यांनी सदस्य शिवाजी कड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीला

Chambli gram panchayat can not be held | चिंबळी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

चिंबळी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

लोकमत न्यूज नेटवर्क
चिंबळी : ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा कारभार नीट चालेना, ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थ यांनी सदस्य शिवाजी कड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. यामुळे चिंबळी ग्रामपंचायतीच्या कारभाराचे वाभाडे निघाले. पोलिसांच्या मध्यस्थीने पुढील अनर्थ टळला.
अनेक दिवसांपासून चिंबळी गावठाण परिसरात पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा होत असल्याने ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे ग्राम सदस्य शिवाजी कड यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावले. चिंबळी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावठाण व परिसरात पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासंदर्भात ग्राम सदस्य शिवाजी कड यांनी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत तक्रार केली, की पाणीपुरवठा सुरळीत करावा. मात्र, ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना पाणीपुरवठा अनियमित करणाऱ्या ग्रामपंचायतीने उपाययोजन न केल्याने सदस्य व ग्रामस्थांनी टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला असल्याचे कड यांनी सांगितले.या वेळी ग्राम सदस्य शिवाजी शरद कड यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिला सुजाता पिरंगुटे, सुनंदा जगनाडे, ताराबाई कड, नीता पिरंगुटे, शैला बारमुख, रजंना शेलार, शोभाताई परदेशी, इतर महिला व ग्रामस्थ यांनी गावात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे टाळे ठोकले.

चिंबळी गावठाण परिसरात पाणीपुरवठा सुरळीत असून कर्मचारी आजारी असल्याने तो वेळेत होत नाही. विहिरीचे दुरुस्तीचे काम केले असून आणखी एका विहिरीचे काम सुरू केले आहे. गावठाण परिसरात पाणीपुरवठा होत नसल्याबाबत लेखी तक्रार कोणत्याही ग्रामस्थाची आलेली नाही. पाणीपुरवठा होत नसलेल्या ग्रामस्थांनी अर्ज दिल्यास ग्रामपंचायात टँकरने पाणीपुरवठा करेल.- दिनेश नांगरे, ग्रामसेवक

Web Title: Chambli gram panchayat can not be held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.