शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या निकालाची टक्केवारी टिकवण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 11:28 IST

फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा प्रश्नपत्रिकेऐवजी कृतीपत्रिकेच्या आधारे घेतली जाणार आहे

ठळक मुद्देशिक्षक ,विद्यार्थी व पालकांमध्ये यामुळे काहीसे संभ्रमाचे वातावरण येत्या ४ डिसेंबरपासून जिल्ह्यातील सात केंद्रांवर सर्व विषयांच्या विषय शिक्षकांना मार्गदर्शन

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा प्रश्नपत्रिकेऐवजी कृतीपत्रिकेच्या आधारे घेतली जाणार आहे.त्यामुळे शिक्षक ,विद्यार्थी व पालकांमध्ये यामुळे काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, कोणतीही भीती न बाळता जिल्ह्यातील सर्व शाळांनी दहावीच्या निकालाची टक्केवारी कशी राखावी, यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे कार्यशाळा घेवून मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात आले. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व मुख्याध्यापक संघातर्फे दहावीची गुणवत्तावाढ,बदललेला अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेऐवजी दिली जाणारी कृतिपत्रिका याबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत विभागीय शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड,डायेटच्या प्राचार्या कमलादेवी आवटे,बालभारतीचे पदाधिकारी सुजीत पाटोळे,शिवाजी तांबे यांनी मार्गदर्शन केले.मीनाक्षी राऊत म्हणाल्या, इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम बदलला असून विद्यार्थ्यांच्या कल्पनेला वाव देण्याच्या दृष्टीने कृतिपत्रिका तयार करण्यात आला आहेत. त्यामुळे राज्य मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कृतिपत्रिकेनुसार घेतली जाणार आहे.परिणामी केवळ घोकमपट्टी करून विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाता येणार नाही.परंतु,शाळांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे वातावरण घालवण्यासाठी आणि शाळांची निकालाची टक्केवारी वाढविण्यासाठी शिक्षण विभागातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पुढील काळात शिक्षकांचे उद्बोधन वर्ग घेतले जाणार आहेत. तसेच येत्या ४ डिसेंबरपासून जिल्ह्यातील सात केंद्रांवर सर्व विषयांच्या विषय शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.हरिश्चंद्र गायकवाड म्हणाले, जिल्ह्यातील शाळांची गुणवत्ता वाढावी या उद्देशाने मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून व शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली कृतिपत्रिकेबाबत कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेस जिल्ह्यातील सुमारे ८०० मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पुढील काळात शिक्षकांचे उद्बोधन वर्ग घेतले जाणार आहेत. तसेच येत्या ४ डिसेंबरपासून जिल्ह्यातील सात केंद्रांवर सर्व विषयांच्या विषय शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.हरिश्चंद्र गायकवाड म्हणाले, जिल्ह्यातील शाळांची गुणवत्ता वाढावी या उद्देशाने मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून व शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली कृतिपत्रिकेबाबत कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेस जिल्ह्यातील सुमारे ८०० मुख्याध्यापक उपस्थित होते....................

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र