राष्ट्रवादीपुढे बंडखोरीचे आव्हान
By Admin | Updated: September 26, 2014 05:30 IST2014-09-26T05:30:10+5:302014-09-26T05:30:10+5:30
शिवसेना-भारतीय जनता पक्षातील युती तुटल्याने जिल्ह्यातील समीकरणेच बदलली आहेत

राष्ट्रवादीपुढे बंडखोरीचे आव्हान
पुणे : शिवसेना-भारतीय जनता पक्षातील युती तुटल्याने जिल्ह्यातील समीकरणेच बदलली आहेत. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या इच्छुकांनी याचा फायदा घेण्यासाठी पावले उचलली आहेत. कॉँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष असे तीन पर्याय त्यांना उपलब्ध झाले आहेत.
खेड : शिवसेनेकडून लढण्यासाठी खेड तालुक्यातून इच्छुकांची संख्या सर्वाधिक होती. तालुक्यातील जवळपास १० जणांनी मुलाखती दिल्या होत्या.
आंबेगाव: तालुक्यात खरी लढत ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रस यांच्यात होणार आहे. आंबेगाव तालुक्यातून राष्ट्रवादीतून बंडखोरी करून नुकतेच शिवसेनेत आलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरूण गिरे यांनी प्रचाराला सुरवात देखील सुरवात केली आहे. या बरोवरच उपजिल्हा प्रमुख विजय पवार, प्रा. राजाभाऊ बाणखेले शिवसेनेकडून निवडणूक तयार करण्यास इच्छुक होते. त्यांना पर्याय उपलब्ध झाला आहे.
जुन्नर : मतदारसंघातही भाजपचे तसे अस्तित्व नाही. त्यामुळे युती तुटण्याचा काही परिणाम होणार असे वाटत नाही. जुन्नर तालुक्यातून २००९ च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेच्या गटनेत्या तसेच सभापती आशाताई बुचके यांचे नाव आघाडीवर आहेत.
पुरंदर : तालुक्यात राष्ट्रवादी तसेच काँगे्रसला शह देत आमदार विजय शिवतारे यांनी विजय मिळविला आहे. भाजपची स्थिती तालुक्यात चांगली नाही. त्यांना येथील जागेसाठी उमेदवार शोधावा लागणार आहे. राष्ट्रवादीचा एखादा बंडखोर उमेदवार त्यांना आयता सापडू शकतो. गेल्या वेळी कॉँग्रेसचे संजय जगताप यांनी बंडखोरी केली होती. त्यांना या वेळी थेट पक्षाची उमेदवारी
मिळेल. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून इच्छुकांची मोठी फौज आहे.
भोर वेल्हा मुळशी : हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. येथे भाजपचे तसे काहीच अस्तित्व नाही. मात्र, भाजपला मानणारा मतदार भोर शहरात
आहे. भाजपला या मतदारसंघात उमेदवारच नाही. भोर तालुकाअध्यक्ष राजेंद्र गुरव यांचे नाव पुढे येऊ
शकते. (प्रतिनिधी)