सगळ्याच पक्षांच्या उमेदवारांची चाळिशी

By Admin | Updated: February 12, 2017 04:56 IST2017-02-12T04:56:22+5:302017-02-12T04:56:22+5:30

पुणे महापालिकेसाठी लढत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारीसाठी तरुणांना पसंती दिली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि मनसे

Chalisa of all the candidates | सगळ्याच पक्षांच्या उमेदवारांची चाळिशी

सगळ्याच पक्षांच्या उमेदवारांची चाळिशी

पुणे : पुणे महापालिकेसाठी लढत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारीसाठी तरुणांना पसंती दिली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि मनसे या पाचही पक्षांच्या उमेदवारांचे सरासरी वय ४० वर्षे आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या उमेदवारांचे सरासरी वय आहे. कॉँग्रेसने काही ज्येष्ठांना उमेदवारी दिल्याने त्यांच्या उमेदवारांचे सरासरी वय हे ४२ पेक्षा थोडे
अधिक आहे. यंदाच्या वेळी प्रथमच स्वबळावर लढत असलेल्या शिवसेनेचे उमेदवार सरासरी ४० वर्षांचे आहेत. तरुण मतदारांना आकर्षित
करून घेण्यासाठी महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेने तुलनेने तरुणांना उमेदवारी दिली आहे.
मनसेचे उमेदवार सरासरी ३६ वर्षांचे आहेत. गेल्या १० वर्षांत पुण्यातील राजकारण आणि अर्थकारणही बदलले. त्याचबरोबर अनेक भागांचा नव्याने विकास झाला. त्यामुळे या भागातील राजकीय आकांक्षा वाढल्या आहेत. त्याचे प्रतिबिंब महापालिकेच्या उमेदवारीमध्ये उमटले आहे.
सगळ्याच पक्षांच्या उमेदवारांकडे पाहिल्यास शहराच्या मध्यवस्तीत तुलनेने प्रौढ उमेदवार आहेत. गेल्या काही वर्षांपासून नगरसेवकपदी असलेल्यांना कोणत्याही पक्षाने नाकारलेले दिसत नाही. मात्र, शहराच्या भोवतालच्या उपनगरांच्या भागात मात्र तरुण उमेदवारांना संधी मिळाली आहे. यामध्येही भाऊबंदकीचे चित्र दिसून येते. पुण्यातील अनेक घराण्यांनी त्या-त्या भागात आपला दबदबा टिकवून ठेवला होता.
गेल्या काही वर्षांत या घराण्यांचा शब्द मानला जात होता. सगळ्याच पक्षांनी या घराण्यांची पुण्याई कॅश करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या भागात साधारणत: चुलत घराण्यांमध्येच लढत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रस्थापितांना तरुणांनी आव्हान दिल्याचे दिसून येते. त्यातही सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस यांच्याकडे प्रस्थापित नेतृत्व असल्याने राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या तरुणांनी भाजपा, शिवसेना किंवा मनसेचा सहारा घेतल्याचे दिसून येते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ३० वर्षांपर्यंतच्या तरुणांना सर्वाधिक उमेदवारी दिली आहे. मनसेचे २० उमेदवार हे ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. ३० ते ४० वयोगटातही मनसेच सर्वांत पुढे असून, त्यांचे ५४ उमेदवार आहेत. त्याखालोखाल शिवसेनेचे ५६ उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षाचे ४१ उमेदवार ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. कॉँग्रेस व राष्ट्रवादीची पुण्यात काही ठिकाणी आघाडी, तर काही प्रभागांत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांची एकट्याची उमेदवारसंख्या इतर पक्षांपेक्षा कमी आहे.
काँग्रेसने २४ ठिकाणी, तर राष्ट्रवादीने २७ ठिकाणी ३० पेक्षा
कमी वयाच्या उमेदवारांना संधी
दिली आहे. मनसे वगळता सगळ्याच पक्षांत सर्वाधिक उमेदवार हे ४० ते ५० वयाचे आहेत. यामध्ये भाजपाचे सर्वाधिक ४८, शिवसेनेचे ४१, राष्ट्रवादीचे ४० व काँग्रेसचे २५ उमेदवार आहेत.
(प्रतिनिधी)

1 पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदाच्या वेळी मोठ्या प्रमाणात चुरस आहे. त्यातच सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याने तरुणांना चांगली संधी निर्माण झाली. भारतीय जनता पक्ष सर्वाधिक १६२ जागा लढवत आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेने १५६ उमेदवार उभे केले आहेत.
2राष्ट्रवादी कॉँग्रेस १३२ ठिकाणी लढत आहे. राष्ट्रवादीबरोबर आघाडी केल्याने कॉँग्रेसने केवळ १०६ ठिकाणीच पक्षाचे अधिकृत उमेदवार उभे केले आहेत. महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेनेही सर्व ठिकाणी उमेदवार उभे न करता १२६ जागाच लढविल्या आहेत.

विद्यमानांना नाकारले : महिला आरक्षण; प्रभाग रचनेचा फटका
नव्याने झालेली प्रभागरचना, महिला आरक्षण यांमुळे अनेक नगरसेवकांना यंदाच्या वेळी लढता आलेले नाही. पक्षांनीही काही विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे ५० ते ६० या वयोगटात सर्वच पक्षांकडील उमेदवारांची संख्या जास्त आहे.
भाजपा आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यापाठोपाठ कॉँग्रेसचे १४ आणि शिवसेनेचे १२ उमेदवार आहेत. मनसेने मात्र या वयोगटातील पाचच उमेदवारांना संधी दिली आहे.

- महापालिका ही राजकारणातील श्रीगणेशाची पाठशाळा मानली जाते. प्रस्थापित राजकारण्यांची दुसरी पिढी या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात आल्याचेही चित्र आहे. सगळ्याच पक्षांनी नवे वारे पाहून भाकरी फिरविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, तो करताना साधारणत: नेत्यांच्या घरामध्येच उमेदवारी दिल्याचेही दिसून येते.

Web Title: Chalisa of all the candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.