चाकणला विषारी नागाचा थरार
By Admin | Updated: September 27, 2014 23:31 IST2014-09-27T23:31:16+5:302014-09-27T23:31:16+5:30
चवताळलेल्या विषारी नागाने चावा घेऊन तीन कुत्र्यांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना चाकणच्या बाजारपेठेत घडली. कुत्र्यांना चावा घेतल्यानंतर या सापाने एका चारचाकी वाहनात खालच्या बाजूने प्रवेश केला.

चाकणला विषारी नागाचा थरार
>चाकण : चवताळलेल्या विषारी नागाने चावा घेऊन तीन कुत्र्यांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना चाकणच्या बाजारपेठेत घडली. कुत्र्यांना चावा घेतल्यानंतर या सापाने एका चारचाकी वाहनात खालच्या बाजूने प्रवेश केला.
हे वाहन वेगात स्पीडब्रेकरवरून चालवूनही विषारी नाग बाहेर येत नसल्याचे पाहून अखेर वाहनात थायमिट मारल्यानंतर तो बाहेर पडला. मात्न, त्याने बाजारपेठेतीलच एका मंदिराच्या दगडी पायात दडी मारली आहे. विषारी नागाच्या या थराराने अनेकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली असून, नागरिकांमधून भीती व्यक्त होत आहे. याबाबतचे वृत्त असे, की चाकणमधील बाजारपेठेत एका मंदिराशेजारी अतिविषारी नागाने तीन कुत्र्यांना चावा घेतल्याने ही कुत्नी दगावल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शीनी सांगितले, की चाकण बाजारपेठेतील सोन्या-चांदीच्या एका व्यापा:याच्या चारचाकी वाहनाखाली झोपलेल्या या कुत्र्यांना चावा घेतल्यानंतर नागाने याच वाहनात खालच्या बाजूने प्रवेश केला. वाहनातून नागाला काढण्याचे अनेक प्रय} करूनही को बाहेर येत नसल्याचे पाहून काही धाडसी युवकांनी हे वाहन वेगात स्पीड ब्रेकरवरून चालवून नाग खाली पडतो का, याचा अंदाज घेतला.
नाग काही केल्या बाहेर येत नसल्याचे पाहून अखेर सर्पमित्न प्रा. रामदास उनधरे व त्यांच्या सहका:यांनी वाहनात मोठय़ा प्रमाणात थायमीटचा मारा केला. त्यानंतर वाहनातून चपळाईने बाहेर पडलेल्या या नागाने शेजारीच असलेल्या मंदिराच्या दगडी पायाच्या भिंतीत आसरा घेतला. सर्पमित्नांनी बराच वेळ प्रय} करूनही हा चवताळलेला विषारी नाग त्यांच्या हाती सापडू शकला नाही. नागाच्या दंशाने अवघ्या काही वेळात ही तिन्ही कुत्र्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तीन कुत्र्यांचा बळी घेणा:या नागाला पाहण्यासाठी परिसरातील व्यावसायिक व नागरिकांनी गर्दी केली होती. या कुत्र्यांना दंश झाल्यानंतर त्यांच्या जखमांवरून विषारी कोब्रानेच हा दंश केला असावा; त्याचप्रमाणो ज्या तीन कुत्र्यांचा या सर्पदंशाने बळी गेला, त्यांनी या नागाला पुढे जाण्यासाठीचा रस्ता अडविला असण्याची शक्यता आहे, असे सर्पमित्न प्रा. बाप्पूसाहेब सोनवणो व रामदास उनधरे यांनी सांगितले. (वार्ताहर)
4नागाच्या दंशाने अवघ्या काही वेळात ही तिन्ही कुत्र्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तीन कुत्र्यांचा बळी घेणा:या नागाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.