चाकणला कचराकोंडी

By Admin | Updated: January 22, 2015 23:19 IST2015-01-22T23:19:26+5:302015-01-22T23:19:26+5:30

शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, चाकणकर त्रस्त झाले आहेत.

Chaknala garbage | चाकणला कचराकोंडी

चाकणला कचराकोंडी

चाकण : शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, चाकणकर त्रस्त झाले आहेत. कचऱ्याचे सुनियोजित व्यवस्थापन करून कायमस्वरूपी नियोजन करण्याची मागणी होत आहे. तसेच, खराबवाडी दगड खाणीतील कचरा डेपो त्वरित न उचलल्यास आंदोलनाचा इशारा वाघजाईनगर, बिरदवडीच्या ग्रामस्थांनी व पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या खराबवाडी येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी दिला आहे.
खराबवाडी येथील डब्ल्यूएमडीसी जवळील दगड खाणीमध्ये चाकण परिसर व तालुक्यातील काही ग्रामपंचायती अनधिकृतपणे कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या करीत आहेत. तसेच, परिसरातील कारखाने रात्रीच्या वेळी रासायनिक व औद्योगिक टाकाऊ कचरा टाकीत आहे. त्यामुळे खाणीलगत असणारी औद्योगिक वसाहत, वाघजाईनगर, बिरदवडी येथील मुळेवस्ती, पवार
वस्तीच्या रहिवाशांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास होत असून, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कचऱ्यामुळे बेवारस कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, परिसरात माश्यांचा उपद्रव सुरूझाला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावून दगड खाणीतील कचरा डेपो बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरात सत्संग विहारजवळ, पोलीस स्टेशनसमोर, चक्रेश्वर रोड, नेहरू चौकातील भाजी बाजार, खंडोबा माळ, आगरवाडी रस्ता, मनशक्ती केंद्राजवळ, मीरा मंगल कार्यालयासमोर, आगरकर वस्तीजवळ, मुटकेवाडीच्या पुलाजवळ तसेच आंबेठाण रोडवर झित्राई मळ्यात, राजलक्ष्मी रेसिडेन्सीसमोर, शिवम सोसायटीसमोर, सहा आसनी रिक्षा वाहनतळाजवळ आदी ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. (वार्ताहर)

४चाकण शहरात मोक्याच्या ठिकाणी, चौकांमध्ये व विशेषत: पुणे-नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग कायमस्वरूपी पाहायला मिळतात. आंबेठाण चौकाजवळील रोहकल फाट्यावरील कांडगेवस्ती, रोहकल फाट्यावर, तळ्याजवळ, वैशाली कॉम्प्लेक्ससमोर, महालक्ष्मी स्टील सेंटरच्या जवळील किराणा दुकानासमोर, कानपिळे पेट्रोलपंप ते वाघेवस्ती, गुडलक हॉटेल ते वास्तुश्री ट्रेडर्स, धाडगे मळ्याकडे जाणारा पूल ते वैशाली ढाबा, गोकूळ कॉम्प्लेक्ससमोर, चाकण-तळेगाव रस्त्यावर राणूबाई मळा, शिक्रापूर रोडवर माणिक चौक, विशाल गार्डनसमोर, पानसरे मळा अशा महामार्गावर असणाऱ्या मोक्याच्या ठिकाणी कचऱ्याची ढीग पडलेले आहेत.

आरोग्याचा प्रश्न
कचऱ्याच्या ढिगात मोठ्या प्रमाणावर हॉटेलमधील शिळे खाद्यान्न, भाज्या, प्लॅस्टिक, केशकर्तनालयातील केस, मोकळ्या बाटल्या, हॉस्पिटलमधील रुग्णांच्या उपचारानंतरच्या टाकावू वस्तू, खराब झालेल्या फळभाज्या व पालेभाज्या आदींचा समावेश असतो. या ठिकाणाहून जाताना नागरिक अक्षरश: नाकाला रुमाल लावून जातात.

Web Title: Chaknala garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.