चाकणला कांद्याची २६ हजार क्विंटल आवक

By Admin | Updated: February 13, 2017 01:18 IST2017-02-13T01:18:42+5:302017-02-13T01:18:42+5:30

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची मोठी आवक होऊन भावात मात्र किरकोळ वाढ

Chakanala 26,000 quintals of onion arrivals | चाकणला कांद्याची २६ हजार क्विंटल आवक

चाकणला कांद्याची २६ हजार क्विंटल आवक

आंबेठाण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची मोठी आवक होऊन भावात मात्र किरकोळ वाढ झाली. बटाट्याची आवक या आठवड्यात निम्म्याने घटली. हिरवी मिरची, लसून, फ्लॉवर, काकडी, वालवड, ढोबळी मिरचीची आवक या आठवड्यात वाढली. गुरांच्या बाजारात म्हशींच्या संख्येत वाढ झाली. शेलपिंपळगाव येथील मार्केट यार्डमध्ये मेथी व कोथिंबिरीची आवक स्थिर राहिली. राजगुरुनगरमध्ये मेथी, कोथिंबीर व शेपूची मोठी आवक झाली. एकूण उलाढाल ३ कोटी ६५ लाख रुपये झाली.
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव : कांदा-एकूण आवक-२६००० क्विंटल. भाव क्रमांक १-८०० रुपये, भाव क्रमांक २-६५० रुपये, भाव क्रमांक ३-५५० रुपये.
बटाटा-एकूण आवक १६०० क्विंटल. भाव क्रमांक १-७०० रुपये, भाव क्रमांक २-५०० रुपये, भाव क्रमांक ३-४०० रुपये.
फळभाज्या : चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक डागांमध्ये प्रती शेकडा डागांना मिळालेले भाव : टोमॅटो (७८५ पेट्या) ३०० ते ७५० रुपये, कोबी (२७४ पोती) १०० ते ३०० रुपये, फ्लॉवर (३६४ पोती) २०० ते ६०० रुपये, वांगी (२९४ पोती) ८०० ते १४०० रुपये,भेंडी (३७८ पोती) २००० ते ३००० रुपये, कारली (९५ पोती) २५०० ते ३५०० रुपये, दोडका (८० पोती) ३००० ते ४००० रुपये, दुधीभोपळा (१६९ पोती) ५०० ते १००० रुपये, काकडी (२८५ पोती) १००० ते १५०० रुपये, फरशी (९० पोती) १००० ते २००० रुपये,वालवड (२७२ पोती) १००० ते २००० रुपये, गवार (८० पोती) ४००० ते ५००० रुपये, ढोबळी मिरची (५९० पोती) १००० ते १५०० रुपये, वाटाणा (६८५ पोती) १००० ते १५०० रुपये, शेवगा ( ७२ पोती) २००० ते ३००० रुपये, चवळी (८२ पोती) १५०० ते २५०० रुपये.
पालेभाज्या : चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व जुड्यांना मिळालेले भाव : मेथी-एकूण २४ हजार ५९० जुड्या (२०० ते ४०० रुपये), कोथिंबीर-एकूण २७ हजार ४२० जुड्या (१०० ते ३०० रुपये), शेपू-एकूण ३ हजार ४५० जुड्या (३०० ते ५०० रुपये), पालक-एकूण ७ हजार ८५० जुड्या (१०० ते ४०० रुपये).

Web Title: Chakanala 26,000 quintals of onion arrivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.