शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

चाकण, तळेगाव, पुण्यासह पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्राला अद्यापही प्रतीक्षाच ;जिल्ह्यात केवळ ३० उद्योग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 16:06 IST

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे पुण्यासह विभागातील सर्व उद्योग, धंदे दीड महिन्यांपासून बंद

ठळक मुद्देअत्यावश्यक सेवेचे ६९२ युनिट सुरू ; २१ हजार कामगारांच्या हातांना काम 

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळे राज्य शासनाने 20 एप्रिल रोजी काही औद्योगिक क्षेत्राकरिता लॉकडाऊन शिथिल करून देखील पुणे जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य केवळ 30 युनिट सुरू झाले आहेत. तर अत्यावश्यक सेवेचे 692 युनिट सुरू झाले असून, यामध्ये सुमारे 21हजार कामगार काम करत आहेत. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे चाकण, रांजणगाव, तळेगाव, हिंजवडी, पुणे, पिंपरी चिंचवड काही प्रमुख औद्योगिक क्षेत्रातील लॉकडाऊन उठण्याची प्रतीक्षा अद्यापही संपलेली नाही.

  कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे पुण्यासह विभागातील सर्व उद्योग, धंदे दीड महिन्यांपासून बंद आहेत. शासनाच्या आदेशानुसार 20 एप्रिल रोजी काही औद्योगिक क्षेत्राकरिता लॉकडाऊन शिथिल करून उद्योग धंदे सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. पुणे जिल्ह्यात देखील दीड महिन्यांपासून बंद पडलेल्या औद्योगिक क्षेत्राला पुन्हा गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. यासाठी प्रत्येक एमआयडीसी क्षेत्रासाठी बंद युनिट सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या देण्यासाठी स्वतंत्र अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. परंतु गेल्या आठ-दहा दिवसांत पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढायला लागली. पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या वाढीचा वेग आणि होणारे मृत्यु देशात सर्वाधिक असल्याचे समोर आले. यामुळे येथील यंत्रणा पुन्हा कोमात गेल्या सारखी झाली असून, सर्वच क्षेत्रांत नव्याने कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील अनेक उद्योग धंदे सुरू करण्याचे अर्ज प्रशासनाकडे येऊन देखील येते परवानगी देण्यात आली नाही.सध्या केवळ शहरासह अन्य भागातील औषधे, फुड प्रोसेसिंग, अ‍ॅग्रिकल्चर प्रोसेसिंग, डिअर प्रॉडक्ट, यासाठी आवश्यक असलेल्या पॅकेजिंग क्षेत्रातील उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही संख्या देखील मर्यादित असून, आतापर्यंत केवळ 692 युनिट सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या सर्व युनिटमध्ये सध्या 21 हजार कामकार काम करत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. -------- पुणे महानगर क्षेत्रात उद्योग सुरू होणे कठीण... राज्य शासनाने औद्योगिक क्षेत्रातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करून टप्प्याटप्प्याने उद्योग धंदे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु पुणे जिल्ह्यातील परिस्थिती गेल्या काही दिवसांत अधिकच गंभीर झाली आहे. यामुळे पुणे महानगर क्षेत्रात उद्योग धंदे सुरू होणे सध्या तरी कठीणच आहे. सध्या अत्यावश्यक सेवा वगळता अन्य केवळ 30 युनिट सुरू झाले आहेत. हे देखील कुरकुभसह जेजुरी या भागातील 30 युनिट सुरू झाले आहेत. यामध्ये केवळ स्थानिक त्या-त्या भागातील कामगार व कर्मचारी घेऊनच काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे .- सदाशिव सुरवसे , माहिती सहसंचालक (उद्योग)

टॅग्स :PuneपुणेMIDCएमआयडीसीbusinessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारNavalkishor Ramनवलकिशोर रामAjit Pawarअजित पवार