शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चाकण - शिक्रापूर मार्गावर भरधाव ट्रकची बससह तीन वाहनांना धडक; काही जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 21:53 IST

चालकाचा ताबा सुटल्यानं झाला मोठा अपघात.

ठळक मुद्देचालकाचा ताबा सुटल्यानं झाला मोठा अपघात.

शेलपिंपळगाव : चाकण - शिक्रापूर राज्यमार्गावर बहुळ (ता. खेड) हद्दीतील धावडदरा  माथ्यावर भरधाव अवजड ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला. अपघातात ट्रकने समोरून येणाऱ्या पीएमपीएलच्या बसला व अन्य तीन चारचाकी कारला धडक दिली. अपघातात बसमधील एका तरुणाच्या शरीरातून एक लोखंडी रॉड आरपार शिरला. सालाबा संभाजी मुंढे (वय २१) असे गंभीर जखमी असलेल्या तरुणाचे नाव आहे. तर अन्य वाहनातील सात ते आठ जण जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडला. चाकण बाजूकडून शिक्रापूर बाजूकडे भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने (एमएच ४६ डी एम ८४५२)  पीएमपीएमएल बससह चारचाकी कार क्र. एमएच १४ एच यु ५५३१, एमएच ४३ बी यु ३८६५, एमएच २० बीएन ०७८९ या तीन वाहनांना धडक दिली.  घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहनातील जखमी प्रवाशांना बाहेर काढले. एका चारचाकी वाहनात दोन लहान मुली होत्या, मात्र सुदैवाने त्यांना इजा झाली नाही. मात्र अपघातात पीएमपीएल बसमधील मुंढे नामक तरुणाच्या मांडीतून कंबरेपर्यंत आरपार एक लोखंडी रॉड शिरला. 

सदरचा रॉड काढणे शक्य नसल्याने संपूर्ण बस चाकण मधील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आली. याठिकाणी लोखंडी कटरच्या साह्याने हा रॉड कापण्यात आला. त्यानंतर तरुणाच्या शरीरातून आरपार झालेला लोखंडी रॉड ऑपरेशन करून काढण्यासाठी त्याला रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर सदरचा ट्रक व अन्य वाहने रस्त्यालगतच्या चारीमध्ये पलटी झाली आहेत. रविवारी उशिरापर्यंत अपघातग्रस्त वाहने घटनास्थळी त्याच स्थितीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल