शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

चाकण-शिक्रापूर महामार्ग ‘खड्ड्यांत’, नागरिकांनी वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 03:10 IST

चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गावर साबळेवाडी, बहुळ, शेलपिंपळगाव, शेलगाव, भोसे आणि रासे गावांच्या हद्दीत मोठमोठे धोकादायक खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहेत.

शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गावर साबळेवाडी, बहुळ, शेलपिंपळगाव, शेलगाव, भोसे आणि रासे गावांच्या हद्दीत मोठमोठे धोकादायक खड्डे पडल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहेत. रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीसंदर्भात नागरिकांकडून वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. परिणामी वाहतुकीदरम्यान रस्त्यावरील दुचाकीस्वारांना तसेच मोठ्या वाहनांना समस्यांचा सामना करत मार्गस्थ व्हावे लागत आहे.चाकण-शिक्रापूर हायवे रस्ता हा पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीन औद्योगिक वसाहतींना जोडणारा मार्ग आहे. मुंबईहून अहमदनगरकडे जाणाºया अवजड वाहनांना वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग सोयीचा असल्याने बहुतांश वाहनचालक याच मार्गाचा प्रवासासाठी अवलंब करत आहेत.औद्योगिक वसाहतींचा कच्चा माल परराज्यांतून घेऊन येणारी अनेक मोठी वाहनेही येथूनच सातत्याने प्रवास करत आहेत. परिणामी राज्य महामार्गावर वाहनांची वर्दळ कमालीची वाढू लागली आहे. मात्र रस्त्यावर बहुतांश ठिकाणी जीवघेणे खड्डे पडल्याने अपघाताच्या संख्येतही कमालीची वाढ होत आहे.शेलपिंपळगाव, बहुळ, चौफुला, साबळेवाडी, भारत गॅस फाटा, शेलगाव, दत्तवाडी, आळंदी फाटा, कडाचीवाडी आदी ठिकाणी भर रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून, काही खड्ड्यांमधून पाण्याचा निचरा होत आहे.परिणामी रात्रीच्या वेळी या पडलेल्या खड्ड्यांभोवती रस्ता निसरडा होत आहे. त्यामुळे वाहन चालवताना चालकाला खड्ड्यांचा तसेच पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहने घसरून पडल्याच्या अनेक घटना वाढत चालल्या आहेत.रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती, साईडपट्ट्या भरणे, गवत काढणे, सूचना फलक लावणे अशी विविध कामे प्रतीक्षेत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर रस्त्याच्या समस्या मार्गी लावण्याची मागणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजीराजे मोहिते, अध्यक्ष शरद मोहिते, जिल्हा परिषद सदस्या निर्मला पानसरे, संचालक धैर्यशील पानसरे, आयडियल फाउंडेशनचे अध्यक्ष अविनाश मोहिते, माहिती सेवा समितीचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पºहाड, खेड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक संतोष आवटे, पुणे जिल्हा भाजपा कामगार आघाडी सरचिटणीस गणेशदळवी, खेड तालुका राष्ट्रवादीयुवक काँग्रेसचे सरचिटणीस राजेश म्हस्के, माहिती सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष साबळे, माजी उपसरपंच तुषार निकम, शेलगावचे सरपंच नागेश आवटे, बहुळचे सरपंच गणेश वाडेकर, माजी उपसरपंच बाळासाहेब कड, उपसरपंच एकनाथ आवटे आदींसह वाहतूकदारांनी केली आहे.धोकादायक फांद्यांची छाटणी करा...चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गालगत मोठमोठी धोकादायक झाडे आहेत. काही झाडे जीर्ण झाली असून, झाडांच्या फांद्या पूर्णपणे वाळल्या आहेत. त्यामुळे अशा फांद्या कधी रस्त्यावर पडतील याचा नेम नाही.यापूर्वी धोकादायक झाडे व झाडांचे फाटे रस्त्यावर कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. शेलपिंपळगाव येथील धोकादायक वळण रस्त्यावर झाडाचा फाटा अनेक दिवसांपासून लोंबकळत आहे. त्यामुळे अशा धोकादायक झाडांचे फाटे रस्ता दुरुस्ती विभागानेतत्परता दाखवून कायमस्वरूपी हटवण्याची गरज निर्माण झाली आहे.शासनाने राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचासंकल्प केला आहे. या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील काहीरस्त्यांवरील पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. परंतु चाकण-शिक्रापूर राज्य महामार्ग अद्यापही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून, वाहतूकदारांसाठी धोकादायकठरत आहे.दर्जाहीन दुरुस्ती...राज्य महामार्गावर पडलेले जीवघेणे खड्डे बुजविण्याचे काम रस्ता दुरुस्ती विभागाने यापूर्वी केले आहे. परंतु खड्ड्यांमध्ये मुरूम किंवा फक्त ठिगळे लावून हे खड्डे बुजविले होते. अद्याप कधीही रस्त्यावर पडलेल्या खडड्ड्यांना डांबर टाकून बुजविले नसल्याने हे खड्डे रौद्ररूप धारण करत आहेत. तर कधीकधी स्थानिक गावातील नागरिक पुढाकार घेऊन स्वखचार्तून हे खड्डे बुजवत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्ग