चाकण पोलिसांचा लॉजवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:10 IST2021-04-03T04:10:30+5:302021-04-03T04:10:30+5:30
याबाबत पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुहास जनार्दन सावंत (वय ३१, रा. दिघी), ...

चाकण पोलिसांचा लॉजवर छापा
याबाबत पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुहास जनार्दन सावंत (वय ३१, रा. दिघी), शंकर मधुकर काळे (रा. च-होली), प्रशांत रामकिसन जगताप (वय ३०, रा. मेदनकरवाडी), संकेत संजय पाटील (वय २३, रा. मेदनकरवाडी), रूपेश दत्ता सूर्या (वय २२, रा. चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मेदनकरवाडी येथील राजतारा लॉजमध्ये दोन महिलांना ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक (गुन्हे) अनिल देवरे, उपनिरीक्षक विजय जगदाळे, नागणे, कुंभार, झनकर, अनिल गोरड, संदीप सोनवणे, हनुमंत कांबळे, प्रदीप राळे आदी पोलिसांच्या पथकाने लॉजवर छापा मारून कारवाई केली. त्यात दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली. आरोपींकडून २५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.