शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

चाकणला बेकायदा प्लॉटिंगचे पंचनामे सुरू

By admin | Updated: May 4, 2017 02:10 IST

चाकणमधील बेकायदा प्लॉटिंगचे पंचनामे नगर परिषदेने सुरू केले आहेत. राजकीय दबाव झुगारून या घटनेची खरीखुरी

महाळुंगे : चाकणमधील बेकायदा प्लॉटिंगचे पंचनामे नगर परिषदेने सुरू केले आहेत. राजकीय दबाव झुगारून या घटनेची खरीखुरी पाळेमुळे खोदल्यास गोरगरिबांना फसवून आणि कुठल्याही सोयी-सुविधा न देता केलेल्या बेकायदा प्लॉटिंग व्यवसायातील अनेकांचे बुरखे फाटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चाकण एमआयडीसीच्या चारही बाजूंच्या आठदहा किलोमीटर अंतरावरील ग्रामपंचायत हद्दीत अद्यापही जोर धरलेल्या प्लॉटिंगच्या बेकायदा प्रकारांना पीएमआरडीए व महसूल विभागाने चाप बसविण्याची मागणी होत आहे.नगर परिषद हद्दीत जमिनींचे रहिवास अथवा इतर कारणांकरिता विकसित करण्यासाठी संबंधित जागेचे रेखांकन मंजूर करण्याचे अधिकार नगर परिषदेस आहेत. जमिनीचे रेखांकन मंजूर केल्यानंतर, जिल्हाधिकारी संबंधित जमिनीच्या अकृषी वापरासाठी परवानगी देतात. त्यानंतरच जमिनींवर विकास केला जातो. मात्र, नियमांच्या फेऱ्यात जाण्याऐवजी अनेकांनी नगर परिषदेच्या अपरोक्ष बेकायदा शेत जमिनींचे प्लॉट पाडून विक्री करण्याचा सपाटा लावला होता.जमिनींचे रेखांकन मंजूर करताना नगर परिषदेकडून, तसेच नगररचना विभागाकडून रेखांकन धारकाने सुविधा पुरवाव्यात, अशा स्पष्ट अटी घालून दिलेल्या असतात. रेखांकित जमिनीत आवश्यक रस्ते, जल:निस्सारण गटारांची व्यवस्था, दिवाबत्तीची व्यवस्था, रेखांकित जमिनीत मोकळ्या ठेवण्यात आलेला भूखंड विकसित करून देणे व त्याला संरक्षक भिंत बांधून देण्याची जबाबदारी रेखांकन धारकाची असते. मात्र त्याकडे प्लॉटिंगच्या व्यवसायातील मंडळी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे नगर परिषद प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर संबंधित बेकायदा प्लॉटिंगचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. अनेक प्लॉटधारक नगर परिषदेकडून बांधकाम परवाना मागतात. मात्र, ती त्यांना देता येत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. ना विकास शेत जमिनींचे प्लॉट पाडून दलाली मिळविणारी मंडळी अज्ञातवासात जात आहेत.या संपूर्ण व्यवहारांमध्ये अनेक प्लॉटिंग करणारे एजंट एखाद्या शेतकऱ्याची शेतजमीन ठराविक रकमेत खपवून देण्याची जबाबदारी ठराविक रक्कम देऊन घेत आहेत. व्यवहार करताना शेतीमालक आणि खरेदीदार याच्यात व्यवहार होतो. शेतकऱ्याला प्रती गुंठा दोन अडीच लाख रुपये देणारे एजंट खरेदीदार नागरिकांकडून प्रती गुंठा पाच ते दहा लाख रुपये उकळत आहेत. या संपूर्ण व्यवहारात एजंट मंडळी नामनिराळी राहत असून, कागदोपत्री कुठेही अडकत नाहीत. त्यामुळे पुढे त्यांचा शोध घेणे आणि या गैरप्रकारात असलेला संबंध स्पष्ट करणे कठीण होणार आहे. काही बडे गुंतवणूकदार थेट शेतजमीन कवडीमोल विकत घेऊन त्याचे प्लॉट पाडत आहेत, असे प्लॉट एनएन (अकृषिक परवानगी) न करताच विक्री केले जात आहेत. (वार्ताहर)मुख्याधिकारी साबळे : त्यांच्यावर कारवाई होणारचाकण नगर परिषदेने नगर परिषद हद्दीतील प्लॉटिंगचे पंचनामे केले आहेत. शनिवारपर्यंत पाच ठिकाणी असे पंचनामे करण्यात आलेले आहेत. बेकायदा प्लॉटिंग करणाऱ्यांना एमआरटीपी अंतर्गत नोटीस बजावण्यात येणार असून, थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. प्लॉटिंगचा आराखडा (ले आउट) नगर परिषदेकडून मंजूर न करताच होत असलेल्या प्रकारांना चाप बसविण्यात येणार आहे. शेत जमिनींचे बेकायदा एका-एका गुंठ्यांचे प्लॉट पाडून विक्री होऊ नये यासाठी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयांना खरेदी-विक्री व्यवहार नोंदवू नयेत यासाठी नगर परिषदेकडून आदेश देण्यात येणार आहेत. तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना पत्रे देऊन अशा शेत जमिनींची खरेदी-विक्री झाल्यास सातबारावर त्याची नोंद होऊ नये यासाठी सूचित करण्यात येणार असल्याचे चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी सांगितले. बेकायदा प्लॉटिंग सुरूच राहिल्यास चाकण शहराचा बोजवारा उडण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.   नगर परिषदेस स्वत:च्या खर्चाने रस्ते, गटारे, सार्वजनिक दिवाबत्ती आदी सुविधा पुरवाव्या लागत आहेत. नागरिकांची अजूनही अशा जमीन व्यवहारातील फसवणूक सुरूच असून आराखडा (ले आउट) सक्षम अधिकाऱ्याने (पीएमआरडीएने) मंजूर केला आहे का? बिगरशेती परवानगी (एन.ए) घेतली आहे का? याची खातरजमा होत नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आहे.