चाकण : चाकण नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत मनीषा गोरे (शिवसेना शिंदे गट) २२८१ मतांनी आघाडीवर आहे. तर भाग्यश्री वाडेकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ) पिछाडीवर आहे. चाकण नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या दोन्ही प्रमुख पक्षांनी विजयी होण्याचा ठाम दावा केला होता. या निवडणूकीत ‘कांटे की टक्कर’ होणार, अशी चिन्हे स्पष्ट दिसत होती.दरम्यान, चाकण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षात लढत होत आहे. परंतु, भाजपने नगराध्यक्ष पदासह बारा प्रभागात उमेदवार उभे केले होते. चाकण नगरपरिषदेत राष्ट्रवादीकडून विकासकामांचा मुद्दा पुढे केला जात होता, चाकणच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग आम्हीच दाखवला असल्याचा दावा केला होता.
भविष्यात राज्य सरकारच्या माध्यमातून शहरातील पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन यावर धोरणात्मक काम करणार असल्याची ग्वाही दिली गेली होती, तर शिंदेसेनेने आजवर राबवलेल्या विविध योजनांचा दाखला देत राज्य सरकारच्या पाठबळामुळे शहरात कोट्यवधी रुपयांची मोठी विकासकामे आम्ही केली असाही दावा करण्यात आला होता. अशात आज मतमोजणी अखेर मतदार कोणाला पसंती देणार हे लवकरच कळणार आहे.
Web Summary : Manisha Gore (Shinde faction) leads by 2281 votes in the Chakan Nagar Parishad election's first round. Nationalist Congress (Ajit Pawar faction) trails. Both parties claimed victory, highlighting development and state government support.
Web Summary : चाकण नगर परिषद चुनाव के पहले दौर में मनीषा गोरे (शिंदे गुट) 2281 वोटों से आगे। राष्ट्रवादी कांग्रेस (अजित पवार गुट) पीछे। दोनों दलों ने विकास और राज्य सरकार के समर्थन पर जोर देते हुए जीत का दावा किया।