चाकण मार्केट सुरु मात्र, खरेदीदारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:36+5:302021-04-11T04:11:36+5:30

राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने विकेंडला कडक लॉकडाऊनचे आदेश दिले. चाकण शहरात सर्वत्र व्यवहार बंद होते. पुणे नाशिक महामार्गावर ...

Chakan Market started, but not the buyers | चाकण मार्केट सुरु मात्र, खरेदीदारच नाही

चाकण मार्केट सुरु मात्र, खरेदीदारच नाही

राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने विकेंडला कडक लॉकडाऊनचे आदेश दिले. चाकण शहरात सर्वत्र व्यवहार बंद होते. पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक अत्यंत तुरळक होती. मात्र खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे चाकण येथील महात्मा फुले मार्केट शनिवारी (दि. १०) सुरु ठेवण्यात आल्याने बाजार समिती आणि पोलीस प्रशासनात हमरीतुमरी झाल्याचा प्रकार घडला.

चाकण मार्केट मध्ये झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हस्तक्षेप केला. मात्र खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी राज्य शासनाने आणि पणन विभागाने दिलेल्या निर्देशानुसार मार्केट सुरु असल्याचे पोलिसांना दटावून सांगितले. त्यानंतर सभापती घुमटकर यांना पोलीसांनी पोलीस ठाण्यात येऊन काय सांगायचे ते सांगा असे म्हणत त्यांना पोलीस ठाण्यात नेले.दरम्यान मार्केट सुरु ठेवल्याने शेतकर्यांनी शेतमाल बाजारात आणला मात्र या शेतमालाला खरेदीसाठी व्यापारी आलेच नाहीत, त्यामुळे कवडीमोल भावाने हा शेतमाल विक्री करावा लागला, अनेक शेतकर्यांनी पुन्हा हा शेतमाल माघारी नेला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी आणि आडत्यांनी सांगितले.

१० चाकण बाजार

चाकण मार्केट मध्ये पोलीस आणि बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांत सुरु असलेली हमरीतुमरी.

Web Title: Chakan Market started, but not the buyers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.