चाकणला सिलिंडरचा स्फोट
By Admin | Updated: May 7, 2016 05:08 IST2016-05-07T05:08:05+5:302016-05-07T05:08:05+5:30
येथील खंडोबा माळ येथे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा गॅस गळती झाल्याने स्फोट होऊन घरातील सर्व वस्तू बेचिराख झाल्या. प्रसंगावधान दाखवत वेळीच आग विझवल्याने

चाकणला सिलिंडरचा स्फोट
चाकण : येथील खंडोबा माळ येथे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा गॅस गळती झाल्याने स्फोट होऊन घरातील सर्व वस्तू बेचिराख झाल्या. प्रसंगावधान दाखवत वेळीच आग विझवल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी घटली.
खंडोबा माळ येथे राहणारे रामदास तुकाराम गोरे यांचा आपल्या घरातील गॅस सिलिंडर संपला, म्हणून त्यांनी आजच दुसरा भरलेला सिलिंडर जोडला. गॅस शेगडी पेटवताच काही मिनिटांतच गॅसगळती होऊन सिलिंडरने पेट घेतला. गोरे यांनी तातडीने पेट घेतलेला सिलिंडर ओढत बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचे प्रमाण जास्त असल्याने त्यांनी व घरातील इतरांनी बाहेर पळ काढल्याने जीवितहानी टळली. या स्फोटात घरातील फ्रीज, टीव्ही, भांडी, कपडे, कपाट यांसह सर्व वस्तू जळून बेचिराख झाल्या. घटनास्थळी चाकणचे मंडलाधिकारी राजाराम मोराळे व कामगार तलाठी एम. एम. चोरमले यांनी पंचनामा केला असून यामध्ये सुमारे एक लाख अडतीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.