शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

चाकणला १७ लाखांचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 01:49 IST

संपूर्ण राज्यात गुटखाबंदी असताना परराज्यातून येणाऱ्या गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो अन्न व औषध प्रशासन व चाकण पोलिसांनी सयुंक्तपणे कारवाई करून रविवारी पहाटे पाचच्या सुमारास पकडला.

चाकण : संपूर्ण राज्यात गुटखाबंदी असताना परराज्यातून येणाऱ्या गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो अन्न व औषध प्रशासन व चाकण पोलिसांनी सयुंक्तपणे कारवाई करून रविवारी पहाटे पाचच्या सुमारास पकडला. यात १७ लाख ३१ हजार ८४० रुपये किमतीचा ४१ पोती गुटखा पकडला असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे व अन्न भेसळ सुरक्षारक्षक महेंद्र पाटील यांनी दिली.या प्रकरणी पोलिसांनी टेम्पोचा चालक व क्लीनर यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून टेम्पोसह २५ लाख ३१ हजार ८४० किमतीचा ऐवज जप्त केला आहे. चाकण परिसरातील ही दुसºयांदा झालेली मोठी कारवाई आहे. त्यामुळे राज्यातील गुटखाबंदीला हरताळ फासल्याचे चित्र दिसत आहे.छुप्या पद्धतीने गुटखाविक्री जिल्ह्यात होत असल्याची माहिती प्रशासना गुप्त खबºयाकडून रविवारी पहाटे मुंबई येथून एक टेम्पो शिक्रापूर येथे गुटखा घेऊन जाणार असल्याची माहिती रात्रीच्या वेळी गस्त घालणाºया पथकाला मिळाली. त्यानुसार येथील तळेगाव चौकात गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी शिताफीने पकडला. या टेम्पोतून वाहतूक करण्यात आलेला १७ लाख ३१ हजार ८४० रुपयांचा गुटखा व ८ लाख रुपयांचे वाहनेअसा सुमारे २५ लाख ३१ हजार८४० रुपयांचा ऐवज चाकणपोलीस अन्न व औषध प्रशासनान यांच्या संयुक्तपणे झालेल्या कारवाईत जप्त केला.टेम्पोचालक बिपीन वैचन गिरी व क्लीनर मुकेश काशी गिरी यांना ताब्यात घेतले आहे. चाकण पोलीस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेखर कुलकर्णी, अजय भापकर, संजय सूळ, नवनाथ खेडकर, होमगार्ड वैजनाथ पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

टॅग्स :Puneपुणे