शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चाकण जाळपोळ व हिंसाचार घटनेचा तपास स्थानिक अन्वेषण विभागाकडे वर्ग : संदीप पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 19:29 IST

सोमवारी ३० जुलैला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्यावेळी काही समाजकंटकांनी शासकीय व खासगी वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली होती. तसेच पोलिसांवरही दगडफेक केली होती.

ठळक मुद्देआणखी बारा आरोपीना अटक, चाकण जाळपोळ व हिंसाचार घटनेतील अटक आरोपींचा आकडा तीस 

चाकण : मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान झालेल्या चाकण येथील जाळपोळ व हिंसाचार घटनेचा तपास स्थानिक अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्याकडे हा तपास वर्ग करण्यात आला आहे. सोमवारी ( ३० जुलै ) झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान वाहनांची जाळपोळ व तोडफोड, हिंसाचार प्रकरणी काल ( दि. ३ ) पाच जणांना अटक केल्यानंतर उशिरा आणखी सात जणांना अशी एकूण बारा जणांना अटक करण्यात आली असून मागील तीन दिवसांत अटकेतील आरोपींची एकूण संख्या आता ३० झाली आहे. सोमवारी ३० जुलैला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्यावेळी काही समाजकंटकांनी शासकीय व खासगी वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली होती. तसेच पोलिसांवरही दगडफेक केली होती. या जाळपोळ व हिंसाचार प्रकरणी शुक्रवारी बारा जणांना अटक केल्यानंतर अटक केलेल्यांची संख्या तीस झाली आहे, त्यापैकी ३ जण अल्पवयीन आहेत. याप्रकरणी शुक्रवारी ( दि. ३ आॅगस्ट ) रोजी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :- ऋषिकेश एकनाथ जगताप ( वय २१, रा.भोसे, गांडेकर वस्ती, ता.खेड, जि.पुणे ), गणेश उर्फ गणपत सतीश मुंगसे ( वय २४, रा.रासे, शिक्रापूर रोड, वलटीप कंपनी समोर, ता.खेड ), स्वप्नील बानू भोर ( वय २२, रा. वाकी बुद्रुक ग्रामपंचायत शेजारी, ता.खेड ), सचिन महादेव शिंदे ( वय १८, रा. शिवम रेसिडेन्सी, आंबेठाण रोड, चाकण ), राहुल दिलीप घोडके ( वय २०, रा. रोहीकर, ता. जि. उस्मानाबाद, सध्या रा. हर्ष हॉटेल, बालाजीनगर, मेघा सेंटर, चाकण ), दीपक युवराज कोरडे ( वय २०, रा.नंदू गोरे चाळ, ऐश्वर्या आंगण समोर, आंबेठाण चौक, चाकण ), जय लालासाहेब ढावरे ( वय १९, रा. दावडमळा, पाण्याच्या टाकीजवळ, चाकण ), अक्षय तानाजी बेंडुरे ( वय २०, रा.दावडमळा, सावतामाळी नगर जवळ, चाकण ), संकेत अरुण व्यवहारे ( वय १८, आंबेठाण चौक, झित्राईमळा, चाकण, मुळ रा.पो. वैराग, ता.बार्शी, जि.सोलापूर ), नागेश गोपीनाथ शिंदे ( वय ३८, वाकी खुर्द, ता.खेड ), नितीन पांडुरंग ढेबे ( वय २१, रा. दावडमळा, चाकण ), ओंकार युवराज कोरडे ( वय १९, रा. आंबेठाण रोड, ऐश्वर्या आंगण समोर, चाकण ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील व अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  दयानंद गावडे, पीएसआय महेश मुंडे व त्यांचे पथक पुढील तपास करीत आहेत. ================= 

टॅग्स :ChakanचाकणPoliceपोलिसCrimeगुन्हाArrestअटकMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा