शिवसेना उमेदवारांच्या मुलावर चाकूहल्ला
By Admin | Updated: February 8, 2017 03:19 IST2017-02-08T03:19:30+5:302017-02-08T03:19:30+5:30
पूर्ववैमनस्यातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने पिंपरीतील शिवसेनेचे उमेदवार दत्तात्रय वाघेरे यांच्या मुलावार चाकुने वार केले. ही घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास पिंपरीगाव येथे घडली

शिवसेना उमेदवारांच्या मुलावर चाकूहल्ला
पिंपरी : पूर्ववैमनस्यातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने पिंपरीतील शिवसेनेचे उमेदवार दत्तात्रय वाघेरे यांच्या मुलावार चाकुने वार केले. ही घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास पिंपरीगाव येथे घडली. वैभव दत्तात्रय वाघेरे (वय २५) असे जखमी तरूणाचे आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचा सरचिटणीस महादेव बिराजदार (वय ४०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव हा शिवसेनेचे उमेदवार दत्तात्रय वाघेरे यांचा मुलगा आहे. पिंपरीगावातून शिवसेनेच्या उमेदवारीवर वाघेरे निवडणूक लढवत आहेत. तर, महादेव बिराजदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारीआहे. वैभव आणि महादेव यांची २०१२ मध्ये भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरुन आरोपीने वैभव याच्यावर कोयत्याने वार केले. त्याला उपचारासाठी चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केले आहे. (प्रतिनिधी)