बापलेकींवर चाकूहल्ला; मुलीचा मृत्यू
By Admin | Updated: March 23, 2016 01:18 IST2016-03-23T01:18:23+5:302016-03-23T01:18:23+5:30
मुलीचे रेल्वेचे आरक्षण तिकीट काढून दुचाकीवरून घराकडे येताना बापलेकींवर चोरट्यांनी हल्ला केला. यात मुलीचा मृत्यू झाला. वडील गंभीर जखमी झाल्याने तातडीने बारामतीला रुग्णालयात

बापलेकींवर चाकूहल्ला; मुलीचा मृत्यू
सुपे/ वासंदे : मुलीचे रेल्वेचे आरक्षण तिकीट काढून दुचाकीवरून घराकडे येताना बापलेकींवर चोरट्यांनी हल्ला केला. यात मुलीचा मृत्यू झाला. वडील गंभीर जखमी झाल्याने तातडीने बारामतीला रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.
दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा हद्दीत ही घटना घडली. शीतल रमेश बाराते (वय २३, रा. बाबुर्डी) असे हल्ल्यातील मृत मुलीचे नाव आहे. वडील रमेश तुकाराम बाराते (वय ५०) गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या मिळालेल्या माहितीनुसार, ते दोघे हिंगणीगाडा दंडवाडी या रस्त्याने घराकडे (बाबुर्डी) येत होते. निर्जन ठिकाणी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांनी मुलीच्या डोक्यात वार केल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तर वडिलांच्या गळ््यावर वार केल्याने दोघे तक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
हिंगणीगाड्याकडे निघालेल्या नारोळीचे माजी उपसरपंच प्रल्हाद ढमे यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी तातडिने येथील संजय खराडे, विलास खराडे व कार्यकर्त्यांना बोलावून खाजगी रूग्णालयात नेले. मात्र मुलीचा मृत्यू झाला होता. नंतर वडिलांना सुपे रुग्णालयात दाखल केले. हा हल्ला कोणत्या कारणावरुन झाला, हे अद्याप कळू शकले नाही. मात्र घटनास्थळी मिरचीच्या पुड्या आढळून आल्या.
त्यामुळे चोरीचा उद्देश असेल तर मुलीच्या बोटातील सोण्याची अंगठी जागेवरच होती, अशी माहिती सहाय्यक फौजदार के. बी. मोरे यांनी दिली. मात्र ही घटना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याची माहिती त्यांनी दिली.