बांबू सोसायटीच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या चेअरमनपदी डॉ. हेमंत बेडेकर यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:11 IST2021-05-12T04:11:58+5:302021-05-12T04:11:58+5:30

मावळते चेअरमन सुनील जोशी (आर्किटेक्ट) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवीन संचालकांच्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये संशोधक ...

As the Chairman of the Maharashtra Chapter of the Bamboo Society, Dr. Selection of Hemant Bedekar | बांबू सोसायटीच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या चेअरमनपदी डॉ. हेमंत बेडेकर यांची निवड

बांबू सोसायटीच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या चेअरमनपदी डॉ. हेमंत बेडेकर यांची निवड

मावळते चेअरमन सुनील जोशी (आर्किटेक्ट) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवीन संचालकांच्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये संशोधक डॉ. मेधा जोशी यांची कार्यकारी संचालकपदी आणि बांबू केमिकल उत्पादक श्रीकृष्ण कुलकर्णी यांची सेक्रेटरीपदी सर्वानुमते निवड झाली आहे. ही निवड २०२१ ते २०२३ या कालावधीसाठी आहे. तसेच बांबू क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे विनय कोलते, नीलेश मिसाळ (बांबू सायकल निर्माते), महेश मोखा, प्रार्थना महाकाळ (आर्किटेक्ट), बांबू टेलचे अशोक सातपुते, पराग घुबडे (आर्किटेक्ट), सलीम सय्यद (बांबू तज्ज्ञ), बांबूपासून ऊर्जा निर्माण क्षेत्रात कार्य करणारे अरुण वांद्रे, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आणि बांबू दागिने तयार करणाऱ्या दया पत्की, मेघा पंचारिया (आर्किटेक्ट), मराठवाड्यात बांबू लागवडीसाठी प्रयत्न करणारे राजकुमार दडगे, रवी नाफडे (बांबू डिझायनर) यांची तज्ज्ञ संचालकपदी निवड करण्यात आली आहे.

----------------------

Web Title: As the Chairman of the Maharashtra Chapter of the Bamboo Society, Dr. Selection of Hemant Bedekar