शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

हडपसर पोलिस ठाण्यातून पळून गेलेल्या सोनसाखळी चोराला छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक

By नितीश गोवंडे | Updated: July 6, 2024 17:13 IST

हडपसर भागात पालखी सोहळा आल्यानंतर दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या धुरपता भोसलेला हडपसर पोलिसांनी बुधवारी (दि. ३) अटक केली होती....

पुणे : पालखी सोहळ्यात दर्शन करण्यासाठी आलेल्या महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली होती. आरोपी महिलेला हडपसर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर तिने पोलिसांची नजर चुकवून पोलिस ठाण्यातून पलायन केले होते. पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. धुरपता अशोक भोसले (३१, रा. टाकळी, ता. सिल्लोड, जि. छ. संभाजीनगर) असे अटक केलेल्या सोनसाखळी चोर महिलेचे नाव आहे.

हडपसर भागात पालखी सोहळा आल्यानंतर दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या धुरपता भोसलेला हडपसर पोलिसांनी बुधवारी (दि. ३) अटक केली होती. तिला तपासासाठी विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या कोठडीतून हडपसर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणले होते. त्यावेळी पोलिसांचे लक्ष चुकवून भोसले हडपसर पोलिस ठाण्यातून पसार झाली होती. या घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठांना देण्यात आली.हडपसर पोलिस ठाण्यातील तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी आरोपी धुरपता भोसले रिक्षातून मुंढव्याच्या दिशेने गेल्याचे आढळून आले. त्यानंतर ती नगर रस्ता परिसरात आली. तिथून बसने ती छत्रपती संभाजीनगरकडे गेल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले. टाकळी गावातून धुरपता भोसले हिला ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलिस उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, पोलिस निरीक्षक निरीक्षक (गुन्हे) मंगल मोढवे, उमेश गिते, सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे, सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, ज्योतीबा पवार, प्रशांत दुधाळ, निखिल पवार आणि प्रशांत टोणपे यांच्या पथकाने केली.एका महिला पोलिस शिपायाचे निलंबन..दरम्यान, अटक केलेल्या आरोपीच्या बाबतीत योग्य ती खबरदारी न बाळगता, बेपर्वा वर्तन केल्यामुळे आरोपीने संधीचा फायदा घेत पळ काढल्याप्रकरणी पोलिस उपायुक्त आर राजा यांनी कर्तव्यात बेजबाबदार व निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून महिला पोलिस शिपाई ताराबाई गणपत खांडेकर यांना शासकीय सेवेतून निलंबित केले. तसेच त्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचे देखील निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी