उपकरामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा धोका वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST2021-02-05T05:04:01+5:302021-02-05T05:04:01+5:30

--- जुन्नर : पेट्रोल व डिझेलचे सध्याचे वाढलेले दर पाहता जाहीर झालेल्या केंद्राचे अर्थसंकल्पमध्ये कोणत्याही प्रकारच्या कमी करण्याच्या दराबाबत ...

The cess will increase the risk of petrol and diesel price hike | उपकरामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा धोका वाढणार

उपकरामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा धोका वाढणार

---

जुन्नर : पेट्रोल व डिझेलचे सध्याचे वाढलेले दर पाहता जाहीर झालेल्या केंद्राचे अर्थसंकल्पमध्ये कोणत्याही प्रकारच्या कमी करण्याच्या दराबाबत ठोस धोरण नाही. उलटपक्षी उपकरात वाढ होईल अशा पध्दतीची तरतूद आहे. त्यामुळे त्याचा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना पडेल व वाढलेले दर कमी होण्यापेक्षा अजूनच वाढतील त्यामुळे उपकर रद्द करावा या मागणीने निवेदन देत पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात निषेध जुन्नर शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.

शहरप्रमुख चंद्रकांत डोके यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करून नायब तहसीलदार सचिन मुंढे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख अविनाश करडीले, नगराध्यक्ष शाम पांडे, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, गटनेते समीर भगत, नगरसेवक नरेंद्र तांबोळी, नगरसेविका सुवर्णा बनकर, अंकिता गोसावी, माजी नगरसेवक शाम खोत, महिला आघाडी संघटिका ज्योत्स्ना महाबरे, समन्वयक माऊली होगे, उपशहरप्रमुख सलिम मुलानी, प्रसिद्धी प्रमुख सोनू पुराणिक, विभागप्रमुख मोनेश शहा, शाखाप्रमुख अमोल माळवे, अमोल बनकर व बहुसंख्येने शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

--

फोटो क्रमांक : ०३ जुन्नर शिवसेना

फोटोओळ-जुन्नर शहर शिवसेनेच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

Web Title: The cess will increase the risk of petrol and diesel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.