तपासणीविनाच प्रमाणपत्र
By Admin | Updated: May 18, 2015 05:40 IST2015-05-18T05:40:47+5:302015-05-18T05:40:47+5:30
एखादी व्यक्ती सक्षम व असक्षम आहे की नाही, याची तपासणी न होताच त्या व्यक्तीला सक्षम असल्याचे प्रमाणपत्र रुग्णालयांमधून दिले जात

तपासणीविनाच प्रमाणपत्र
पिंपरी : एखादी व्यक्ती सक्षम व असक्षम आहे की नाही, याची तपासणी न होताच त्या व्यक्तीला सक्षम असल्याचे प्रमाणपत्र रुग्णालयांमधून दिले जात आहे. कामाचा वाढता व्याप व रुग्णालयात होणारी गर्दी यामुळे अगदी सोप्या पद्धतीने प्रमाणपत्रावर कोणतीही तपासणी न होता सक्षम असल्याचे प्रमाणपत्र नागरिकांना दिले जात आहे.
संबंधित प्रमाणपत्रप्राप्त व्यक्तीला प्रमाणपत्र मिळते. मात्र, खेदाची बाब ही आहे की, रुग्णालयात सर्व तपासणी केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. समोरील व्यक्ती पाहताक्षणी सक्षम आहे का, असे विचारले जाते. रुग्णालयाचा सही व शिक्का दिला जातो. मात्र, ही बाब एखाद्याच्या जिवावर बेतण्यासारखी आहे, याचे गांभीर्य वैद्यकीय विभागाला आलेले नाही. हे प्रमाणपत्र खास करून खेळाडू, महापालिकेचे जलतरण तलाव, नोकरीसाठी महत्त्वाचे ठरत आहे. शासकीय स्तरावर वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा, शाळांच्या सहली, ट्रेकिंगकरिता, दूर अंतरावरचा प्रवास, निवृत्त कर्मचारी, व्हिसाकरिता, नोकरीत रुजू होण्यापूर्वी, ५० वर्षे वयावरील व्यक्ती आदींसाठी फि टनेस प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, मोठ्या शिखरांवरील चढाईसाठी जाणाऱ्या खेळाडूंसाठीच लागणाऱ्या प्रमाणपत्राकडे लक्ष दिले जात असल्याचे दिसून येत आहे. बाकी सर्व विषयांसाठी लागणारे प्रमाणपत्र किरकोळ स्वरूपाचे आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. फि टनेस प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची ओपीडी, मेडिकल, सर्जरी, इएनटी म्हणजे कान, नाक,
घसा आदीची तपासणी केली जाते. यामध्ये दातांचे, छातीचे, हाडांचे काही आजार आहेत की नाही, याचीही तपासणी होते.(प्रतिनिधी)